पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यवहाराध्याय. व्यवहारपरिभाषा. राजानें, राग व लोभ सोडून, विद्यासंपन्न ब्राह्मणांस मदतीस घेऊन, धर्मशास्त्रांत सांगितलेल्या नियमांस अनुसरून व्यवहार ( न्यायाचें काम ) चालवावा. १ वेदशास्त्रांचें ज्यांनीं पूर्ण अध्ययन केलेले आहे, जे धर्मशास्त्राचे नियम जाणतात, जे नेहेमी सत्य बोलतात, व जे मित्र आणि शत्रु यांस समदृष्टीने पाहतात, अशांस राजानें सभासद करावें. २ दुसऱ्या कांहीं विशेष कामांत गुंतल्यामुळे राजास जातीनें न्यायाचें काम पाहवत नसेल तेव्हां सभासदांस मदतीस घेऊन न्यायाचें काम चालविण्यासाठी त्यानें सर्व धर्म जाणणारा ब्राह्मण नेमावा. ३ जे सभासद पक्षपातानें, लोभानें, किंवा भीतीनें [ एकाद्या दाव्यांत ] स्मृतींत सांगि तलेल्या नियमाविरुद्ध चालतील त्यांस प्रत्येकी दाव्यांतील रकमेचे दुप्पट दंडाची शिक्षा करावी. ४ धर्मशास्त्र व आचार यांस सोडून अन्य मार्गानें जर कोणी मनुष्यानें दुसन्यास पीडा दिली आणि अशा पिडलेल्या मनुष्यानें राजाजवळ गान्हाणें नेणें हें [ सामान्यतः ] व्यवहाराचें लक्षण होय. ५ वादीची फिर्याद असेल ती प्रतिवादीचे समक्ष लिहून घ्यावी; [ आणि ] त्या लेखांत वर्ष, मास, पक्ष, व मिति लिहून नांव, जात वगैरेचा उल्लेख करावा. ६ फिर्याद काय हे समजल्यावर प्रतिवादीने दिलेला जाब वादीचे समक्ष लिहून घ्यावा; नंतर जें मागणे असेल त्याच्या बळकटीसाठी पुरावा देणें तो वादीनें तत्काळ लिहून घेववावा. [ खात्रीलायक पुरावा ] देववेल तर वादीस फैसला मिळेल; [ तसा पुरावा ] न झाल्यास त्याचा दावा बुडेल. हा व्यवहार न्यायाचे कामांत चार विभागांचा दर्शवि- लेला आहे. ८ असाधारण मातृका. ू चालू झालेल्या दाव्यांतील तकरारीचा निकाल होण्याच्या पूर्वी वादीविरुद्ध उलट दावा आणण्यास प्रतिवादीस परवानगी देऊं नये; एका अपराधाबद्दल मुकदमा चालु