पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. करभार घेतो. गुप्त हेरांचे द्वाराने आपला राज्यकारभार चालविणारे कारभारी लोक काय काय करतात हे समजून घेऊन, [ कारभाच्यापैकी ] जे न्यायमार्गानें चालत असतील त्यांचा सन्मान करून, वाईट चालीच्यांस शिक्षा द्यावी. जे लांच घेत असतील त्यांचें सर्व द्रव्य जप्त करून त्यांस देशपार करून द्यावें. ३३८ नजराणे, मानसन्मान, आणि आदरातिथ्य, इत्यादिकांनी श्रोत्रियांस नेहेमी संतुष्ट ठेवावें. आपल्या प्रजांवर अन्याय करून जो राजा आपला जामदारखाना भरतो, त्याची संपत्ति थोडक्याच काळांत जाऊन सर्व कुटुंबासह त्याचा नाश होतो. प्र जांस पीडा दिल्यापासून जो अग्नि (संतापानि ) उत्पन्न होतो, ३३९ तो राजाची संपत्ति, त्याचें कुल व त्याचे प्राण यांस जाळून टाकल्यावांचून शांत होत नाहीं. स्वतःचे राज्याच्या परिपालनाच्या संबंधाने जो राजाचा धर्म आहे, ३४१ तोच धर्म, राजाने परराज्य आपल्या सत्तेखाली आणिलें असतां त्याला लागू होतो. ज्या देशांत जे आचार, व्यवहार, व कुलाचारं, कुलस्थिति, वगैरे जसे अस तील, ३४ ३४२ ते जशाचे तसेच, परमुलख ताब्यांत आल्यास राखावे. ज्या अर्थी सर्व राज्याचा पाया राज्यकारस्थानें हा आहे, त्या अर्थी. ती गुप्त राखावीं. ३४३ [ अशा रीतीनें कीं ] योजिलेली कामें पुरी झाल्यावांचून कोणासही तीं राज्यका रस्थानें कळूं नयेत. राजाने आपल्या अगदी शेजारच्या राजांत नेहेमीं शत्रु असें ले- खावें, त्याहून पलीकडच्यांस मित्र, व त्याहूनही दूरच्यांस उदासीन (ह्मणजे दोन्ही पक्षाकडील नव्हे ) समजावें. ३४४ आपल्या शेजारच्या राजांशीं [ सर्व प्रकरणांत ] सामादिक उपाय अनुक्रमानें योजावे. ते उपाय [ ह्मटले ह्मणजे ] साम (मैत्री ), दान (लांच, करभार, वगैरे देणें ), भेद ( शत्रूचे मंडळींत कलह लावणे वगैरे ), व दंड ( हल्ला करून शिक्षा करणे), ३४१ हे उपाय योग्य रीतीनें लढविले असतां व्यर्थ जाणार नाहीत, यश येईल. दुसऱ्या कोणत्याही उपायाचा उपयोग नाहींसा झाल्यास मात्र दंड करावा. सल्ला करणें, लढाई करणे, पुढे चाल करणे, तळ धरून बसणें, किंवा एकाद्या बलाढ्य राज्याची कुमक घेणें, ३४६ तसेंच स्वसैन्याचे विभाग करणे, ही सर्व जसजसा प्रसंग येईल तसतशी करावी. परराज्यांत धान्य व इतर सामग्री पुष्कळ असेल तर त्या राज्यावर स्वारी करावी. ३४७ तसेंच जेव्हां शत्रु बलहीन दिसेल व स्वतःजवळ पाणीदार घोडे वगैरे वाहनें व लोक असतील तेव्हां शत्रूवर स्वारी करावी. कार्यात यश येणें ही गोष्ट दैव व पुरुषाचा पराक्रम या दोहोंवर अवलंबून असते. ३४८