पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. ३३ रणांगणांतून फिरलेल्यास, किंवा केवळ युद्ध पहाण्यासाठी गेलेल्यास कधीही मारूं नये. आपले व प्रजांचें रक्षण करीत असतां राजानें [ सकाळी ] उठून जमाखर्च स्वतः पहावे. ३२६ त्यानंतर राज्यप्रकरणाची कामे पाहून त्यापुढें राजानें स्नान करून आपल्या इच्छेप्रमाणें भोजन करावें. आपल्या कारभाऱ्यांनी आणिलेले सुवर्ण स्वतःचे जाम- दारखान्यांत त्यानें ठेवावें. ३२७ नंतर मंत्र्यांसहित [ दरबारांत बसून ] चारांची भेट घ्यावी, व दूत पाठवावे; मग त्यानें स्वेछेनें ऐषआराम करावे, पाहिजे तर मंत्र्यांसह दुसरें काम करावें. ३२८ नंतर सैन्यांची देखरेख करावी व सेनाधिपतींची भेट घ्यावी व त्यांशी सल्लामस- लत करावी. संध्याविधि नंतर करावा व पुढे आपल्या गुप्त हेरांच्या गोष्टी ऐकाव्या. ३२९ हे झाल्यावर त्यानें गाणें नाचणें ऐकत भोजन करावें. मग वेदाध्ययन करावें. तें झाल्यावर सुस्वर वाद्यांच्या नादांचे ध्वनी चालत ठेवून त्या नादानें निजावें व त्याच ध्वनींनी [ पहाटेस ] जागें व्हावें. ३३० जागे झाल्यावर त्याने शास्त्रांचें व जी कामें करणे असतील ती कशी करावयाची याचें चिंतन करावें. नंतर आपल्या चारांचा आदर करून, त्यांस आपले मांडलिक राजांकडे वं अन्य राजांकडे पाठवावें. , ३३१ पुढें आपले ऋत्विज, पुरोहित, आणि आचार्य यांच्या आशीर्वादानें तुष्ट झालेल्या राजानें ज्योतिषी व वैद्य यांच्या भेटी घ्याव्या व त्यांस, तसेंच श्रोत्रियांस, गोदानें द्यावीं, सोनें द्यावें, भूमिदान द्यावें, ३३२ लग्नाचे प्रसंगी देण्याजोग्या वस्तू द्याव्या, व घरें द्यावीं. राजानें ब्राह्मणांशी क्षमा- शील रहावें, स्नेह्यांशीं खुल्या मनानें वागावें, व शत्रूंशी क्रोधयुक्त असावें. ३३३ आपल्या नोकरांस व रयतलोकांस राजाने त्यांच्या बापासारखें व्हावें. न्यायानें आपल्या प्रजांचें पालन करणाऱ्या राजास प्रजांच्या पुण्याचा सहावा हिस्सा प्राप्त होतो; ३३४ कारण प्रजांचें परिपालन करणें हें दानांहून अधिक श्रेष्ठ दान होय. ठक- लोक, चोर, वाईट चालीचे लोक, मोठे साहसी, घातकी लोक, ३३५ आणि विशेषतः कायस्थलोक (लेखकीचें काम करणारे ), इतक्या लोकांच्या हातून होणाऱ्या पीडांपासून प्रजांचें रक्षण करावें. जर प्रजांचें रक्षण होणार नाहीं तर लोक हरकोणतेंही पापकर्म करतात, ३३६ [ आणि ] त्या पापाचा अर्धा वांटा राजास प्राप्त होतो, कारण प्रजांपासून राजा ५ 3