पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. त्यानें शास्त्रोक्त रीतीनें यज्ञ करावे; पुष्कळ दक्षिणा द्याव्या; [ तसेंच ] भोग्य वस्तु व अनेक प्रकारची द्रव्यें ब्राह्मणांस द्यावीं. ३१४ ३१५ जें विप्रांस दान दिलें तो राजाचा अक्षय निधि समजला पाहिजे. कोणताही क मीपणा ज्यांत नसेल, नाश न होण्याजोगें, व प्रायश्चित्तांनीं अदूषित, असे कांहीं विप्ररूप अग्नीत होम केलें (विप्रांस दिलें ) ते प्रत्यक्ष अग्नीत हवन केल्याहून श्रेष्ठ असें या लोकांत ह्मटले जाते. जें आपणापाशीं नाहीं तें धर्मानं मिळवावें; व जे मिळालेले असेल तें यत्नानें रक्षावें. ३२ ३१६ जें रक्षिलेले असेल तें नीतीनें वाढवावें; आणि वाढविलेले योग्य ठिकाणी द्यावें. राजानें भूमि दिल्यास किंवा निबंध (आश्रितांत दिलेले वृत्त्यादिक ) दिल्यास राज दानाबद्दलचा लेख करावा. त्या ३१७ पुढे होणाऱ्या शुभराजांच्या माहितीसाठी राजानें कापडाच्या किंवा तांब्याच्या पत्र्याचे शिरावर आपली मुद्रा (मोर्तत्र ) वठवावी. ३१८ आपल्या वंशांतील पुरुषांची नावें व आप नांव राजानें लिहवून प्रतिग्रहाचें परि- माण ( दिलेल्या वस्तूंचें माप, जमीन असल्यास लांबी रुंदी) व त्याच्या चतुःसीमा ( लिहवून), ३१९ कायमचें आज्ञापत्र मितीसह स्वहस्ताचे सहीनिशीं करवावे. सुखावह, पशूंत अ- नुकूल, निर्वाहाच्या वस्तु जेथें असतील व जेथें अरण्ये असतील, अशा देशांत राजानें आ पली राजधानी करावी. ३२० आपली रयत, आपके द्रव्य यांच्या व स्वतःच्या बचावासाठी त्या देशांत राजानें किल्ले बांधावे. निरनिराळ्या कार्यासाठी शहाणे, कुराल व निष्पाप मुख्याधिकारी, उत्पन्न आणि खर्च करणाऱ्या व्यवस्थेच्या कार्यात झटणारे असे नेमावे. ३२१ लढाईंत मिळविलेले ३२२ द्रव्य ब्राह्मणांस द्यावें, आणि रयत लोकांत कोणाहीपासून भीति न राही असें करावें. याहून राजाला दुसरा मोठा धर्म नाहीं. [ स्वदेश ] भूमीच्या रक्षणासाठी जे पुरुष [ शत्रूंस ] पाठ दाखविल्यावांचून लढाईत मरतात, ३२३ ते, त्यांनी कपटशास्त्रांचा उपयोग केलेला नसल्यास योगिपुरुषाप्रमाणे स्वर्गास पोंचतात. पराजय पावून पळापळ झाली असतां, जे मागें पाय घेत नाहींत त्यांच्या पाव- लांची योग्यता यज्ञ केल्याच्या पुण्याइतकी आहे. ३२४ लढाईतून पळ काढून परत येत असतां जे मरतात त्यांचें पुण्य राजास मिळतें. ' मी तुझा आहे' असें ह्मणणारास, नपुंसकांस, शस्त्र नसलेल्यास, दुसऱ्यानें भर दिल्या- मुळे लढणारास, ३२५