पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय.. मिश्रित माँसमिश्रित भात, आणि चित्रान्न ( मसाल्याचा भात ) ही अनुक्रमानें ब्राह्मणांस द्यावों. ज्ञात्या पुरुषानें ग्रहांच्या आदरार्थ ब्राह्मणांस भोजन घालावें. २९९-३०४ कर्त्याच्या शक्तचनुसार व त्याजवळ द्रव्य असेल त्या प्रमाणाने त्यांचा (ब्राह्मणांचा ) शास्त्रोक्त रीतीनें सत्कार झाल्यानंतर [ वर सांगितलेली दानें वगैरे करावीं ]. दुभती गाय, शंख, बळकट पोळ, सोनें, वस्त्र, घोडा, काळी गाय, शस्त्र, आणि बकरा, हीं अनुक्रमानें ग्रहांचे आदरार्थ योग्य दानें सां- गितलेली आहेत. ज्यास जो ग्रह जेव्हां अनिष्ट असेल त्या ग्रहाचें त्यानें तेव्हां प्रयत्नानें पूजन करावें. ब्रह्मदेवानें त्यांस (ग्रहांस ) असा वर दिलेला त्याचें तुझी कल्याण कराल.' राजांचे उत्कर्ष व अपकर्ष, 'जो तुमची पूजा करील [ आणि ] जगताची स्थिति किंवा लय ग्रहांच्या स्वाधीन आहेत, ह्मणून ग्रह हे अतिपूज्य होत. राजधर्मप्रकरण. आपली कामे करण्यास ज्याला मोठा उत्साह, स्थूललक्ष ( ज्ञाता किंवा दाता ), झालेल्या गोष्टी स्मरणारा, वृद्धाची सेवा करणारा, नम्र, सत्वगुणसंपन्न, कुलीन, सत्य बोलणारा, शुद्ध, कोणतेही काम त्वरित कर ण्यास समर्थ, ज्याची स्मृति मोठी, निंद्य असेल त्याचा तिरस्कार करणारा, मृदु अंत:- करणाचा, ३०९ धार्मिक (स्वधर्मानें वागणारा), ज्यास दुर्व्यसन नाहीं, बुद्धिमान्, शूर, गुह्य गोष्टी गुप्त ठेवण्यांत चतुर, स्वतःत आलेला कमीपणा गुप्त ठेवण्यांत चतुर, आत्मज्ञान व नीति- ज्ञान यांत प्रवीण, ३१० कृषिकर्म, व्यापार, आणि ऋग्वेद व सामवेद हीं पुरेपणीं जाणणारा असा राजा असावा. बुद्धिमान्, उंच कुळांतले, नेहेमी एकसारखे चालणारे व निर्दोष असे मंत्री राजानें नेमावे. ३११ [ राजानें ] सर्व प्रकारचा राज्यकारभार चालविण्यांत पहिल्यानें त्यांचा सल्ला घ्यावा; दुसऱ्यानें ब्राह्मणांचा विचार घ्यावा, व तिसऱ्याने स्वतःच विचार करून योग्य कर्तव्य तें करावें. ज्योतिषशास्त्र जाणता व ज्ञानसंपन्न असा पुरोहित ( गृहधर्मकर्मे करणारा ) राजानें नेमावा. ३१२ [ पुरोहित ] राजधर्म जाणणारा असून अथर्व, आंगिरस ( अथर्ववेदाचा भाग ) जाणता असावा. तसेंच श्रुत्युक्त व स्मृत्युक्त सर्व धर्मकर्मे करण्यासाठी ऋत्विज नेमावे.