पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० याज्ञवल्क्यस्मृति. फुलांची माळ धारण करून [ अंगास ] उटी लावून, २९१ त्यानें ब्राह्मणांस भोजन घालावें, ब्राह्मणांस व आपल्या गुरूस वस्त्रांची जोडी [ शेलापागोटें, वगैरे ] द्यावी. याप्रमाणे विनायक व ग्रह यांची शास्त्रेक्त विधीनें पूजा केल्यानें २९२ सर्व कर्माचें फल त्यास प्राप्त होतें, व अनुपम लक्ष्मी मिळते. जो. सूर्याची पूजा, नित्य करतो आणि कार्तिकस्वामीचा तिलक (प्रतिमा) २९३ व महागणपतीचा तिलक करतो त्याला सिद्धि प्राप्त होते. ग्रहशांतिप्रकरण. लक्ष्मी किंवा शांति प्राप्त व्हावी अशी ज्याला इच्छा असेल त्यानें ग्रहयज्ञ चांगल्या रीतीने करावा. २९४: तसेच पाऊस पडावा, आयुष्यवृद्धि व पुष्टि व्हावी, अशी ज्यानी इच्छा असेल, त्यानें व जारणमारण करण्याची ज्याची इच्छा असेल त्यानेंही [ ग्रहयज्ञ करावा ].. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पति, २९५. शुक्र, शनि, राहु [ आणि ] केतु, यांस ग्रह असें ह्मटलेलें आहे. तांब्याची, टिकाची, रक्तचंदनाची, दोन सोन्याच्या, स्फ- २९६ रुप्याची, लोखंडाची, शिशाची, कांशाची [ याप्रमाणें ] क्रमानें [ग्रहांच्या प्रतिमा] कराव्या. अथवा ज्यांच्या त्यांच्या रंगांच्या गंधांनी वस्त्रावर किंवा तशा रीतीने जमीन रंगवून तीवर प्रतिमा कराव्या. २९७ [ नंतर ] त्यांचे वर्णाप्रमाणे त्या त्या रंगांची फुले व वस्त्रे त्यांस अर्पित तसेंच सुगंधि द्रव्यें, बलि, धूप व गुग्गुल ( सुवासिक द्रव्य ) ही द्यावीं. करावी .. २९८ 6 6 6 [ नंतर पुढे सांगितलेल्या मंत्रांनी ] अनुक्रमानें प्रत्येक ग्रहदेवतेस समंत्रक चल- चा बलि द्यावाः आकृष्णेन ’, ‘इमं देवाः', अग्निर्मूर्द्धा दिवःककुत्' ' उद्बुध्यस्व', 'बृहस्पते अतियदर्यः', 'अन्नात् परिस्रुतः ' या [ व पुढील ] अनुक्रमानें ऋचा जाणा- व्या. 'शंनोदेविः’ ‘ कांडात्', [ व ] ' केतुं कृण्वन्'. अर्क ( रुई ), पलाश, खदिर ( खैर ), अपामार्ग (आघाडा ), पिंपळ, उंबर, शमी, दूर्वा, कुश, या. प्रत्येक ग्रहा- प्रीत्यर्थ हवनाच्या अनुक्रमानें समिधा [ समजाव्या ]. प्रत्येक ग्रहास एकशें आठ किंवा. अठ्ठावीस समिधा [ असाव्या ] आणि मध आणि तूप यांत बुडवून किंवा दहीं आणि दूध यांत बुडवून त्यांर्षे हवन करावें. गूळमिश्रित भात, खीर, हविष्यान्न, साठ दिव- सांत पिकणाऱ्या साळींचे तांदूळ दुधांत शिजवलेले, दहीभात, तूपमिश्रित तीळ-