पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ ओषधींचें एकत्र केलेलें औषध ) आणि निरनिराळे सुगंधि पदार्थ ही त्याचे मस्तकास लावावी. आचाराध्याय. २७७ [ असे केल्यावर त्याला भद्रासनी ( भद्रपर्णी नांवाच्या वनस्पतीच्या आसनीं ) योग्य ब्राह्मणांकडून त्यास [ उद्देशून ] स्वस्तिवाचन ( कल्याणकारक मंत्रांचे पठण ) करवावें. घोड्यांच्या तबेल्यांतली माती, हत्तीखान्यांतली माती, वारुळाची माती, नद्यांचे संगमांतील माती, किंवा तलावांतील माती, २७८ रोचन ( गोरोचन ), सुगंधी द्रव्ये आणि गुग्गुळ [ हीं आणून ] तीं तलावांतून आणलेल्या पाण्याने भरलेल्या एकाच रंगाच्या चार कलशांत टाकावी. २७९ [ नंतर ] बैलाच्या तांबड्या कातड्यावर [ वर सांगितलेलें ] भद्रासन घालावें. मग “ज्यांचें सामर्थ्य अनंत, ज्यांना शेंकडों धारा, ज्यांना ऋषींनीं पवित्र केलें, २८० त्या उदकांनीं [ मी ] तुझें मार्जन करतों. ही पवित्र करणारी उदकें तुला पवित्र करोत. राजा, वरुण, सूर्य, आणि बृहस्पति, २८१ इंद्र, वायु, सप्तर्षेि हेही तुला ऐश्वर्य देवोत. तुझ्या केशांत, भांगांत, जें दुर्भाग्य असेल, २८२ [ तसेंच ] कपाळावर, कानांत आणि नेत्रांत [ दुर्भाग्य असेल त्याचा ] हीं उदकें नाश करोत;" असें ब्राह्मणांनी बोलावें. याप्रमाणे स्नान झाल्यावर उंबराच्या लांकडाच्या पळीनें शिरसांचें तेल २८३ [ घेऊन, उपाध्यायानें आपल्या ] डाव्या हातीं कुश घेऊन ह्याचे ( व्याधिताचे ) डोक्यावर 'मिताय स्वाहा, संमिताय स्वाहा, शालाय स्वाहा, कटंकटाय स्वाहा, २८४ कुष्मांडाय स्वाहा, [ आणि.] राजपुत्राय स्वाहा, असें ह्मणून होम करावा. [ नंतर ] नमस्कारासह व मंत्रांसह [ वरील ] नांवांनीं बलिदान करावें. २८५ सुपांत सर्व बाजूंम कुश पसरून ते चवाठ्यावर ठेवावे आणि त्यांत अर्धवट तांदुळ झालेल्या साळी, कुटलेल्या तिळांच्या पिठानें मिश्रित भात, २८६ शिजलेले व हिरवे मासे, [ पूर्वी सांगितल्या जातींचें ] मांस, चित्रविचित्र रंगांचीं फुले, सुगंधि द्रव्यें, तसेंच तीन जातींचें मद्य, २८७ मुळा, पोळी, घारगे, उंड्याच्या माळा, दहीभात, क्षीर, गुळपीठ, व मोदक, २८८ [ हीं सर्व ] ठेवून, नंतर भूमीवर मस्तक ठेवून विनायकाची माता अंबिका हिचा धांवा करावा. २८९ [ नंतर ] दुर्वा, शिरस व फुले यांची ओंजळ भरून अर्पण करून [ प्रार्थना क- रावी ]: “ हे भगवति, मला रूप दे, यश दे, व पूर्णैश्वर्य दे; 66 २९० पुत्र दे, द्रव्य दे, [ आणि ] सर्व मनोरथ पूर्ण कर. " नंतर शुभ्र वस्त्र नेसून शुभ्र