पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. पुत्र, श्रेष्ठत्व, सौभाग्य, समृद्धि, मुख्यता, कल्याण, सर्व जगांत मुख्यत्व, व्यापार, आणि अशाच इतर गोष्टी, २६५ निरोगीपणा, यश, दुःखापासून सुटका, परमगति, द्रव्य, वेदांचें ज्ञान, वैद्यकक्रियेंत यश, सोन्यारुप्यावांचून इतर धातु, तसेंच गाई, शेळ्या, मेंढ्या, २६६ घोडे, व दीर्घ आयुष्य यांची प्राप्ति व सर्व मनोरथ, जो पुरुष कृत्तिका नक्षत्रापासून भरणी नक्षत्रापावेतों नेहेमीं विधिपूर्वक श्राद्ध करतो त्यास प्राप्त होतात. २६७ श्राद्धकर्त्यानें आस्तिक व भक्तिमान् होऊन मद व मत्सर यांचा त्याग करावा. वसु, रुद्र आणि आदित्य हे पितरांचे प्रतिनिधिभूत आहेत; आणि हेच [ श्राद्ध देवता ] होत. श्राद्धानें तुष्ट झालेल्या देवता श्राद्धकर्त्यावर संतुष्ट होतात. आयुष्य, संतति, द्रव्य, विद्या, स्वर्ग, मोक्ष, सुख; २६८ २६९ तसेंच राज्य हीं, पितर मनुष्यावर संतुष्ट झाल्यास त्यांस देतात. २८ गणपतिकल्प... कर्मात विघ्ने॑ होऊं नयेत ह्मणून विनायक ( गणेश ) देवतेस शिव आणि ब्रह्मदेव यांनी गणांमध्यें मुख्यस्थानीं योजिलें आहे. ज्याच्या अंगीं गणपति संचारत होतो त्याच लक्षणे ऐक. २७०-२७१ फार खोल पाण्यांत गेल्याप्रमाणे ज्याला स्वप्नांत वाटतें, मस्तकी केंस नाहीत असे पुरुष दिसतात, तांबड्या वस्त्रांनी शृंगारित अशा मांसभक्षक जनावरावर आपण स्वारी केलेली पाहातो, २७२ चांडाल, गाढवें व उंट यांचे समूहांत आपण आहो असें जो [ स्वप्नांत ] पाहतो व आपण चाललें असतां पाठीमागून शत्रु येताहेत असें ज्यास भासतें, २७३ ज्याचा (गणपतीचा ) ज्याचे अंगीं संचार झाला असतां त्या पुरुषाचें चित्त ठिका- णीं नसतें, कार्यात यश येत नाहीं, कारणावांचून चिंताग्रस्तासारखा असतो, आणि तो जरी राजपुत्र असेल तरी त्याला राज्य मिळणार नाहीं; २७४

  • कुमारीला नवरा मिळत नाहीं; विवाहित स्त्रीस गर्भधारण किंवा संतान व्हाव-

याचें नाहीं; श्रोत्रिय असून आचार्यत्व मिळणार नाहीं; व विद्यार्थ्यास विद्याप्राप्ति होणार नाहीं; २७५ व्यापारी असल्यास त्यास नफा होणार नाहीं; शेत्यास पीक होणार नाही. [ खालीं सांगितलेले ] विधीनें [ गणेशसंचरित ] मनुष्यास शुभ दिवशीं स्नान घालावें; २७६ पांढरे शिरस व तूप यांची उटी त्याचे अंगास लावावी; आणि सर्वौषधि ( विशेष