Jump to content

पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. ‘येसामाना' या दोन मंत्रांनी प्रेताच्या अर्धपात्रांतील पाणी. बाकीच्या तीन पितृ- षात्रांत ओतावें. बाकीचा विधि सर्व पूर्वी सांगितल्याप्रमाणे करावा. या श्राद्धास ( सपिंडीकरण ) पूर्वीच्या पितरांशीं मृतपुरुषास मिळविणे ह्मणावें.. एकोद्दिष्टश्राद्ध स्त्रीचेंही करावें. मरणाचे तिथपासून एक वर्षाचे आंत सपिंडीकरण झाले असले तरी २५४ मृतमनुष्यास [ उद्देशून ] एक संवत्सरपावेतों अन्न व उदकुंभ ब्राह्मणास यावीं, आणि एक वर्षपावेतों [ चांद्रमानाप्रमाणे ] दर महिन्यास मरणतिथीस श्राद्ध क सवें. २१९ [ तसेंच ] त्यापुढे दरवर्षास श्राद्ध करावें. प्रथम श्राद्ध मरणदिवसापासून अकरावे दिवशीं करावें. पिंड देणें ते गाय, शेळी, ब्राह्मण, अग्नि, यांस द्यावें, किंवा पाण्यांत. द्यावे.. २१६. ब्राह्मणांचे देखत [ त्यांनीं भक्षिलेल्या ] अन्नांतून राहिलेले उच्छिष्ट काढूं नथे. हविष्यान्नानें एक मासपावेतो आणि क्षीरीनें एक वर्षपावेतों [ पितर तृप्त राह- तात ]. २१७ [ तसेंच ] मासा, तांबड्या पाठीचे हरिण, मेंढा, पक्षी, मेंढी, चितळ ( चित्र- हरिण), काळे जातीचें हरिण, शिंगाचा हरिण, सनडुकर, आणि ससा या प्रत्येकाचे मांसा- ने अनुक्रमानें २५८ उत्तरोत्तर एक एक महिना ज्यास्ती [ काळपोवता ] पितर तृप्त राहतात. गेंड्याचें मांस, महाशलक [ नांवाचे. ] माशाचें मांस, मध, मुनींचें अन्न ( वनांतील कंदमुळे देवभातादिक ), २५९ तांबड्या बकऱ्याचे मांस, भाजी, किंवा पांढऱ्या [ ह्याताया बकऱ्याचे मांस ], जो पितरांस देतो [ तो व गयेचे ठायीं जो ] पिंडादिक देतो तो अक्षय्य सुख पावतो. २६० तसेंच वर्षात्रयोदशीचे दिवशीं ( भाद्रपद वद्य त्रयोदशीस), विशेषतः मघा नक्षत्र- युक्त ती तिथी असेल तेव्हां जो [पिण्ड] देतो [ तो अक्षय्य सुख पावतो ]. कन्या, जांवई, गुरेढोरें, सत्पुत्र; २६१ द्यूतकर्म, शेतकी, आणि व्यापार [ यांत यश ], ज्यांचे खुर विभागलेले आहेत ते व नाहीत ते असे पशु, विद्येनें प्रकाशणारे पुत्र, सोनें, रुपें व इतर सर्व धातु; २६२. ज्ञातींत श्रेष्ठत्व, आणि इच्छिलेले सर्व मनोरथ हीं, जो पुरुष, चतुर्दशीशिवाय करून चांद्रमासाच्या इतर प्रत्येक तिथीस नेहेमीं श्राद्ध करतो, त्यास प्राप्त होतात. २६३: जे शस्त्रानें मारले गेले असतील त्यांस उद्देशून त्या दिवशीं (चतुर्दशीस) श्राद्ध क-- रावें. स्वर्ग, संतति, तेजस्वीपणा, शौर्य, पृथ्वी, बळ, २६४: