पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. निरनिराळे द्यावे २ ]. मातामहादिकांसही (आईकडील पितरांसही ) याच रीतीनें पिंड द्यावे. नंतर ब्राह्मणांस आचमन द्यावें. २४२ हे झाल्यावर [ ब्राह्मणांकडून ] 'स्वस्तिवाच्य' (श्राद्धकर्त्यास आशीर्वादार्थ वचन ) बोलवावें, व अक्षय्योदक द्यावें. शक्तीप्रमाणे ब्राह्मणांस दक्षणा देऊन स्वधाकार पुनः ह्मण- ण्याची आज्ञा मागावी. २४३ ' तसे कर' अशी ब्राह्मणांची आज्ञा झाल्यावर 'पितरांकरितां स्वधाकार बोलावा,' असे श्राद्धकर्त्यानें ह्मणावें. ब्राह्मणांनीं 'स्वधा असो' असे प्रत्युत्तर दिल्यावर त्याने जमिन नीवर पाणी शिंपडावें. २४४ ' विश्वेदेव संतुष्ट होवोत' असे श्राद्धकर्त्यानें ह्मणून त्यावर ब्राह्मणांनी प्रत्युत्तर दि- ल्यावर [ पुढे सांगितल्याप्रमाणें ] त्यानें ह्मणावें:- 'आमचे कुळांत दाते पुष्कळ होवोत; ' 'आमची संतति वाढो;' 'वेदांचा उत्कर्ष होवो.' ‘आमची श्रद्धा क्षयास न जावो;' आणि 'दान करण्यास योग्य [द्रव्यादिक] आह्मांस पुष्कळ मिळो,' असें ह्मणून व [ ब्राह्मणांस उद्देशून ] आनंद देणारी भाषणें बोलून त्यांचे पायां पडावें; [ व नंतर ] पितरांचे पिंडांचें विसर्जन करावें. २४६ आनंदित अंतःकरणानें ‘वाजे वाजे' या मंत्रानें पहिल्यानें पित्याच्या पिंडाचें [ अशा अनुक्रमानें ] विसर्जन करावें. ज्या पात्रांत पूर्वी अर्धेदक ठेवलेलें होतें, २४७ तें पितृपात्र उलथें करून ब्राह्मणांस निरोप द्यावा. त्यांच्या पाठीमागें थोड्या अंतरापावेतों जाऊन त्यांस प्रदक्षिणा करून परत यावें व पितरांनी भक्षून बाकी राहिलेले असेल त्या अन्नाचें त्यानें भोजन करावें. २४८ श्राद्धकर्त्यानें व ब्राह्मणांनी त्या रात्री स्त्रीसंभोग करूं नये. याच रीतीनें वृद्धिश्राद्ध नांदीमुखनामक पितरांची [ पिंडदानादिकांनी ] तृप्ति करावी. नांदीश्राद्धांत सर्व पितृक्रिया मदक्षिण प्रकाराने करावी. २४९ पिंड करणें ते भात, दहीं, व बोरें यांचे करावे, आणि सर्व क्रिया यवांनी कराव्या. एकोद्दिष्टश्राद्धांत देव यावयाचे नाहीत. अर्धोदकास एकच पात्र [ असावें ], व अर्धपवित्र- क एकाच दर्भाचें असावें. [ तसेंच ] २५० पितरांस 'आवाहन' नाहीं, व 'अग्नौकरण' नाही. यज्ञोपवीत अपसव्य असावें. [ पूर्वी सांगितलेल्या श्राद्ध ] ' अक्षय्यं ' असें ज्या ठिकाणीं [ ह्मणण्यास सांगितलेले आहे तेथें ] ‘ उपतिष्ठतां' असें या ( एकोद्दिष्ट ) श्राद्धांत ह्मणावें. ब्राह्मणांस निरोप दे- ण्याचे वेळेस २५१ 'संतुष्ट व्हा,' असें त्यांस ह्मणावें. त्यांनी 'आह्मी संतुष्ट झालों' असे प्रत्युत्तर द्यावें. अर्चेदकासाठी चार पात्रें, गंध, उदक, आणि तीळ यांनी भरलेली असावी. २५२