पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

·आचाराध्याय. 6 देवी' या मंत्राने पाणी ओतावें; नंतर त्या पाण्यांत 'यवोसि' या मंत्रानें यव टाकावे. २३० या दिव्या' या मंत्रानें ब्राह्मणाचें हातीं अर्ध द्यावे, नंतर उदक देऊन गंध, फुलें धूप, दीप [ अर्पण करावे ]. २३१ नंतर आच्छादन देऊन हस्तशुद्धीसाठी पाणी द्यावें. नंतर अपसव्य करावें व डावे- कडून पितरांकडे वळावें. २३२ दर्भ द्विगुणित करून ब्राह्मणांस दिल्यावर ब्राह्मणांची आज्ञा घेऊन 'उशंतस्त्वा' या ऋचेनें पितरांचें आवाहान करावें. त्यापुढे 'आयन्तु नः' या मंत्राचा जप करावा. २३३ यवांची कार्ये तिलांनी करावी आणि पूर्वी सांगितलेल्या रीतीनें अर्घादिक करावें. ब्राह्मणांचे हातीं अर्ध देऊन विधीप्रमाणें तें अर्धजल एका पात्रांत सांठवावें. २३४ 'पितृम्प:स्थानमसि' या मंत्रानें तें पात्र खाली ( जमिनीवर पालथें करावें ). नंतर घृतयुक्त चरु हातीं घेऊन अग्नौकरण करण्यासाठी ब्राह्मणांची आज्ञा मागावी. २३५ ब्राह्मणांनी 'कर' अशी आज्ञा दिल्यावर पितृयज्ञांत करतात तसे अग्नीत अर्पण करून हुतशेष ( अग्नीत अर्पण करून राहिलेलें अन्न ) स्वस्थचित्त होत्साता त्यानें थोडॆ थोत्रे॑ पात्रांत द्यावें. २३६ ● [ पात्रें ] शक्तीप्रमाणे मिळवावीं. विशेषतः रुप्याची असावी. त्या पात्रांत अन्न वाढून ' पृथिवीपात्रं ' या मंत्रानें अभिमंत्रण करावें. २३७ 'इदंविष्णु ' या मंत्रानें ब्राह्मणांचा आंगठा त्या [ अन्ना ] वर लावावा. [ नंतर ] 'व्याहती ' व 'मधुवाता' या तीन ऋचांसह गायत्रीजप करावा. , २३८ [ जप झाल्यावर ] ' यथेच्छ भोजन करावें ' असे [ ब्राह्मणांस ह्मणावें ]. परंतु ब्राह्म- णांनी न बोलतां भोजन करावें. न रागावतां न घाई करतां ब्राह्मणांस हवें असेल तें अन्न व हविष्यान्न ( कांही विशेषजातीचें अन्न ) वाढावें. २३९ तृप्ति होईपावेतों [ अन्न वाढावें ]. भोजन होत असतां पवित्र [ सूक्तें ] आणि पूर्वोक्त मंत्रांचा जप करावा. [ श्राद्धकर्त्यानें ] हातीं अन्न घेऊन, 'आपण तृप्त झालांना असें' विचारावें; [ आणि ] बाकीचें ( राहिलेल्या अन्नाचें ) काय करावें ह्मणून त्यांची आज्ञा मागावी. २४० नंतर प्रत्येक ब्राह्मणाचे हातीं उदक देऊन बाकी राहिलेले अन्न जमिनीवर पसरून ब्राह्मणाचे हातावर एक एक वार जल द्यावें; तीळ मिसळलेले सर्व अन्न (भात ) हाती घेऊन दक्षिणेकडे तोंड करून, २४१ [ ब्राह्मण जेऊन त्यांचें ] उच्छिष्ट राहिलेले असेल त्याजवळ पितृयज्ञांत पिण्ड देतात तसे पिंड द्यावे. [ क्षेपकः-दोन वर्षांचे मुलाचे तोंडांत राहतील एवढे पिंड करावे आणि भूमीवर