पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. व्याधित ब्राह्मण, ज्यास एकादा अवयव कमी किंवा जास्ती आहे तो ब्राह्मण, एका डोळ्यानें आंधळा ब्राह्मण, पौनर्भव ( दुसऱ्यानें लग्न झालेल्या स्त्रीचा पुत्र ), अवकीर्णी ( ब्रह्मचर्यव्रतभंग झालेला ), कुंड ( नवरा जिवंत असतां जारापासून झालेला ), गोलक ( नवरा मेल्यावर जारापासून झालेला ), ज्याची नखें मुरडलेली असतील तो, ज्याचे दांत काळे असा, २२२ [ क्षेपक: विनन - ( नग्न वृत्तीनें राहाणारा), अधाशी, पांढरा कुठरोग झालेला, ज्याचें पुंस्त्व गेलेलं आहे, रोगी, वाईट भाषण करणारा, गुरे चारणारा वगैरे, शिक्षा करण्या वें काम (फटके मारणे वगैरे) करणारा, वाण्याचे वृत्तीनें राहणारा, व शस्त्रे वरून विकणार, ] विद्यार्थ्यांकडून द्रव्य घेऊन शिकविणारा, नपुंसक, कन्या भ्रष्ट करणारा, वाईट कीर्तीचा, स्नेह्याचा द्रोह करणारा, मागें निंदा करणारा, सोम -[ रस] विकणारा, परिविंद- क (वडील भावापूर्वी लग्न करणारा ), x २२३ बाप, आई किंवा गुरु यांस सोडून देणारा, कुंडाचे हातचें खाणारा ( किंवा कुंड, चार शेरांचें अन्न खाणारा, ह्मणजे मोठा खादाड ), स्वधर्म सोडणान्याचा पुत्र, दुसऱ्यानें लग्न झालेल्या बायकोचा नवरा, चोर, व शास्त्रोक्त कर्मानें न चालणारा, हे श्राद्धभोजनास अयोग्य होत. २२४ [ श्राद्धकर्त्यानें ] मनाची स्थिति चांगली ठेवून व पवित्र राहून श्राद्धाचे पूर्व दिव- शीं ब्राह्मणास बोलवावें. बोलावलले ब्राह्मणांनी काया, वाचा, आणि मन यांचा संयम केला पाहिजे. २२६ अपराण्हीं ( दिवसाचे पांच विभाग कल्पून त्यांतील चौथे विभागांत) ते आल्यावर त्यांचा स्वागतानुकूल शब्दांनी आदरसत्कार करून त्यांनी आचमन केल्यावर त्यांस [ श्राद्धकर्त्यानें ] शुद्ध हातांनी आसनावर बसवावें. २२६ [ श्राद्धास बोलावण्याच्या ब्राह्मणांची संख्या ] [ श्राद्धकर्त्याच्या ] शक्तीप्रमाणें देवस्थानीं सम असावी, पितृस्थानीं विषम असावी; जागा शुद्ध, स्वच्छ केलेली व आच्छा- दित असून दक्षिणेकडे उतरती असावी. २२७ देवस्थानीं दोन ब्राह्मणांनीं पूर्वाभिमुख बसावें; पितृस्थानीं तीन ब्राह्मणांनी उत्तराभि- मुख बसावें; किंवा [ दर एक स्थानीं ] एक एक ब्राह्मण असावा. मातामहाच्या श्राद्धींही हाच नियम लागतो. वैश्वदेविक ( विश्वेदेवांचे तृप्त्यर्थ कर्म ) या दोन्ही श्राद्धांत एकच २२८ २४ किंवा निरनिराळें करावें. त्यांस पाणिप्रक्षालनासाठीं [ उदक ] देऊन व आसनार्थ दर्भ देऊन [ ब्राह्मणांची ] आज्ञा घेऊन 'विश्वेदेवासः' या ऋचेनें त्यांचें (विश्वेदेवांचें ) आवाहन करावें. २२९ [ नंतर ] जमिनीवर यव टाकावे, व कुशांनीं एक पात्र स्वच्छ करून त्यांत ' शन्नो-