पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. ( उटी ), वाहन, वृक्ष, [मागणाराची] इच्छित वस्तु, बिछाना, यांचें दान करणारा अत्यंत सुखी होईल. २११ ब्रह्मस्वरूपाचें ज्ञान हे सर्वधर्ममय होय; ह्मणून ते सर्व प्रकारच्या दानांपेक्षां वरिष्ठ. जो हैं ब्रह्मज्ञान इतरांस [ करून ] देतो तो ब्रह्मलोकाचा उपभोग घेतो, व त्यास अधः- पाताची भीति रहात नाहीं. २१२ दान घेण्यास आपणास अधिकार असूनही जो दान घेत नाहीं तो, दान देणारे पुरुष ज्या अनेक लोकीं पोंचतात, त्या लोकी पोंचतो. २१३ कुश, शाकभाजी, दूध, मासे, सुगंधी द्रव्यें, फुलें, दहीं, जमीन, मांस, बिछाना, बैठक [ आसन, पाट, वगैरे ], भाजलेले यव, आणि पाणी, हीं देणारानें ध्या ह्मटल्यास घेणारानें परतवूं नयेत. २१४ [ वरील वस्तू ] मागितल्यावांचून दुराचारी माणसानेही दिल्यास घ्याव्या; मात्र कसबीण, नपुंसक, जातिभ्रष्ट, व शत्रु यांनी दिल्यास त्या घेऊं नयेत. २१५ देव व अतिथी यांचें पूजनादिक करण्याच्या उद्देशानें, आपल्या गुरूच्या निर्वाहा- साठीं, किंत्रा [ बायकामुले वगैरे ] आपणांवर अवलंबून राहाणारांच्या निर्वाहासाठीं, किंवा स्वतःच्या निर्वाहासाठी, कोणाहीपासून दान घ्यावें. २१६ श्राद्धप्रकरण. अमावास्या, अष्टका ( हेमन्त व शिशिर ऋतूंतील कृष्णपक्षाच्या अष्टम्या ), पुत्र- जन्मादिकाच्या प्रसंगी करावयाचें नांदीश्राद्ध, कृष्णपक्ष, दक्षिणायन, उत्तरायण, [ श्राद्धा- स अवश्य ] सामग्री, व ब्राह्मणसमूह [ मिळण्यासारखी असतील तेव्हां ], व्यतिपात, गज- च्छाया ( पर्वविशेष ), सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, आणि श्राद्धकर्त्यास जेव्हां इच्छा होईल तो काळ, हे श्राद्धकाल होत असे सांगितले आहे. २१७–२१८ तरुण असून वेदनिष्णात, श्रोत्रिय, ब्रह्मवेत्ता, वेदांचा अर्थ जाणणारा, ज्येष्ठसामाचें ( ज्येष्ठसामवेदसंज्ञक वेदभागाचें ) अध्ययन करणारा व ते जाणता, त्रिमधु ( ऋग्वेदां- तील विशेष तीन ऋचा ) यांचें अध्ययन करणारा, व त्या जाणणारा; किंवा त्रिसुपर्ण जाणता, बहिणीचा मुलगा, ऋत्विज, जांवई, यज्ञकर्ता, सासरा, मामा, त्रिणाचिकेत ( तैत्तिरीय ब्राह्मणाचा भाग पढणारा ), दौहित्र, विद्यार्थी, संबंधी, बांधव (भाईबंद ), कर्मनिष्ठ, तपश्चर्यानिष्ठ, वैतानाग्नि धारण करणारे, ब्रह्मचर्यत्रतानें चालणारे, आणि आपल्या मातापितरांची एकनिष्ठपणानें चाकरी करणारे, असे ब्राह्मण श्राद्धसंपत्तीस [ बोलावण्यास ] योग्य होत. २१९-२२०-२२१