पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. [ व ] पाठीन, राजीव, सशल्क ( माशांच्या जाती), हे ब्राह्मणक्षत्रियवैश्यांनीं खाण्यास योग्य होत. आतां मांसभक्षण कधीं करावें व कधीं न करावे याचा विधि ऐका. प्राणरक्षणासाठी, किंवा श्राद्धभोजनाचे वेळेस मांस खाल्यास, यज्ञसंबंधी मांस खा- ल्यास, ब्राह्मणाची इच्छा पुरविण्यासाठी [ तयार केलेले ], देवता व पितर यांची तेणेंक- रून आरंभी पूजा करून नंतर अवशिष्ट मांस खाल्यास, खाणारा दोषी होत नाही. १७९ जो दुराचारी मनुष्य शास्त्रोक्त रीतीशिवाय इतर मार्गांनी [ भक्षणासाठी ] पशुवध करील तो, [ त्या पशूच्या अंगावर ] जितके केश असतील तितके दिवस भयंकर नर- कवास भोगील. १८० ब्राह्मणाने कधीही मांस न खाल्यास त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील व त्यास अश्व- मेध केल्याचें पुण्य लागेल. मांस न खाणारा ब्राह्मण घरांत रहात असला तरी तो ऋषि- तुल्य समजला पाहिजे. वस्तूंची शुद्धि करण्याविषयीं. सोन्याचे आणि रुप्याचे भांड्यांची, शिंपी, उलूखलादि यज्ञपात्रें, पळी, दगड, शाकभाजी, दोरी, कंद, फळें, वस्त्रे, बांबूच्या वस्तु ( सुप, टोपली, वगैरे ), कातडें; १८२ [आणि] प्रोक्षणी वगैरे, तशींच चमस (यज्ञपाचें), यांची शुद्धि पाण्यानें होते. भात शिजविण्याचें भांडें, स्रुक् ( यज्ञपात्र ), स्रुव, ( सोमवडीचा रस पिण्याची पळी ), व तेलाची भांडी [ यांची शुद्धि ] ऊन पाण्यानें होते. स्फ्य ( यज्ञांतील आयुध ), सूप, मृगचर्म, धान्य, लांकडाचे मुसळ, लांकडा चें उखळ, गाडा, यांची, आणि जमा केलेले धान्य व कापड हीं पुष्कळ असल्यास त्यांची, शुद्धि पाणी शिंपडल्यानें होते. लांकूड, शिंगें, हार्डे, यांची शुद्धि तीं वरून तासल्यानें होते. फळांच्या करटीचे, केलेले भांड्यांची शुद्धि गाईच्या केशांचे कुंचीनें होते. यज्ञांत यज्ञपात्रांची शुद्धि त्यांवर हातानें पाणी शिंपडल्याने होते. १८५ उंटाचे लोकरीच्या किंवा रेशमाच्या वस्त्राची शुद्धि खारी माती, पाणी, व गोमूत्र यांनीं होते; गोणपाटाची शुद्धि बेलफळ [ पाणी आणि गोमूत्र ] यांनीं होते; आणि शाल जातीचें वस्त्र रिटे [ पाणी व गोमूत्र ] यांनी शुद्ध होतें. क्षौमवस्त्राची ( सणाच्या कापडाची ) शुद्धि पांढऱ्या मोहय [ पाणी व गोमूत्र ] यांनीं होते; मातीचें भांर्डे पुनः तापविल्यानें शुद्ध होतें. कारागिराचा हात [ नेहेमीं ] शुद्ध आहे; तसेंच विकण्याची वस्तु, भिक्षा आणि स्त्रीचें मुख [ नेहेमीं ] पवित्र. १८७