पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराभ्याय. 10 विटाळशा बायकोनें स्पार्शळेलें, [ रस्त्यांतून वगैरे ] वाटलेलें, [ एकाचें असून ] दुस- प्यानें दिलेलें, गाईनें हुंगलेर्ले, पक्ष्याने उष्टावलेलें, बुद्धिपूर्वक पायानें स्पर्शिलेले अन्न घेऊ नये. तूप ज्यांत पडलेलें असतें तें अन्न शिळे व फार वेळ ठेविलेले असले तरी खाण्यास योग्य होय. तसेच तेल न घातलेले गव्हांचें किंवा यवांचें अन्न, व गाईच्या दुधाचे पदार्थ [ समजावे ]. १६९ गाभण्या गाईचें, गाय व्याल्यावर दहा दिवसपावेतों किंवा जिला वांसरूं नाही तिचें दूध वर्ज करावें. [त्याचप्रमाणे ] उंट किंवा व ज्यांचे खुर विभागलेले नाहीत अशा जनावरांचें, स्त्रीचें, जंगली जनावरांचें आणि मेंढीचें दूध वजवें. १७० देवतांसाठी तयार केलेल्या बलीतील अन्न, शेवगावृक्षांतून निघालेला तांबडा चीक ( लाख, गोंद), झाडास टोंची मारून त्यांतून निघालेला रस, हवन न केलेले मांस, त्सित जाग्यावरील भाजीपाला आणि छत्रके ही वजवी. मांसभक्षक पक्ष्यांचें मांस, चातकाचें, पोपटाचें, सुतार [ नांवाच्या ] पक्ष्याचें, टिट्टिभ पक्ष्याचें, सारस (क्रौंच ) पक्ष्याचें, ज्यांचे खुर विभागलेले नाहीत अशा जनावरांचे व हं- साचें, आणि घरांत पाळलेल्या पक्ष्यांचें मांस वर्ज करावें. १७२ कुर्कुचा, पाण्यांतील पक्ष्यांचें ( बदकांचें वगैरे ), चक्रवाक पक्ष्याचें, बलाक ( कु- कुँचाची एक जात ) पक्ष्याचें, बगळ्याचें, व विष्किर (चकोरादिक, चोचीनें किंवा पायांनी भक्ष्य विदारण करून टाकणाऱ्या ) पक्ष्यांचें, मांस [ वर्ज करावें ]. तसेच कृसर (खिचडी), संयाव ( शिरा), पायस ( क्षीरान ), अपूप (अनारसे वगैरे ), व शष्कुली ( करंज्या ), ही अन्नें प्रथम देवास अर्पण केल्यावांचून [ खाऊं नयेत ]. १७३ चिमण्यांचें मांस, डोमकावळयांचें, कुररपक्ष्याचें, रानकोंबड्याचें, ज्याचे पायांचे पंज्यांची बोटे कातड्यासारख्या अवयवानें एकत्र जोडलेली असतात त्या पक्ष्याचें, खंजरीट पक्ष्याचे, व माहीत नसलेल्या पशुपक्ष्यांचें मांस [ वर्ज करावें ]. १७.४. चाष पक्ष्याचें मांस, तांबड्या पायांचे पक्ष्यांचें, खाटिकाच्या घरचें मांस, वाळवलेले मांस आणि मासे हीं वर्जावीं. आपल्या इच्छेनें हीं खाल्यास तीन दिवस तीन रात्री उपोषण करावें. १७५. कांदा, पाळलेलें डुक्कर, छत्राक (ज्यास अळंवें ह्मणतात), पाळलेला कोंबडा, लसू ण, गुंजन (गाजर), [ यांतून कोणतेंही ] खाल्यास चांद्रायण प्रायश्चित्त करावें. १७६. पांच नख्यांचे जनावरांपैकीं, साळजीवत, घोरपड [ जातीचें जनावर ], कांसव,. शल्लक (साळजीवत जनावराचा एक प्रकार), ससा, यांचे मांस; माशांपैकी, सिंहतुंडक, रोहित जातीचे मासे;