पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. जमिनीची शुद्धि झाडल्यानें, जाळल्यानें, कालांतरानें, गाय वरून चालल्यानें, पाणी शिंपडल्यानें, खणल्यानें व सारविल्याने होते. घराची शुद्धि झाडल्याने आणि [ शेणाचे ] सारवणानें होते. १८८ गाईनें हुगलेल्या, किंवा केश, माशी अथवा किडा यांनी सदोष झालेल्या अन्नावर पाणी, भस्म किंवा माती टाकिल्यानें त्याची शुद्धि होते. १८९ कथील, शिसें आणि तांत्रें यांची शुद्धि खार, चिंच, आणि पाणी यांनी होते; कांसें आणि लोखंड यांची शुद्धि राख आणि पाणी यांनीं होते; आणि पातळ पदार्थ [ अन्य भांड्यांत तोंडोतोंड भरेपावेतों ] ओतल्यानें शुद्ध होतो. १९० अमेध्यानें ( दुर्गंध पदार्थानें ) लिप्त झालेली वस्तु मातो व पाणी यांचेोगें शुद्ध होते, कारण त्यापासून दुर्गंध निघून जातो; [ ब्राह्मणाचे ] वाणीनें जें शुद्ध असे हाटलें गेलें, जें पाण्यानें धुतलें, व अपवित्र ह्मणून जें माहीत नाहीं तें सर्व नेहमीं शुद्ध. १९१ गाईची तहान भागण्याइतकें स्वाभाविक स्थितीत असलेलें व जमिनीवरचें पाणी शुद्ध [ होय ]; तसेंच कुत्र्यानें, चांडालानें, किंवा मांसभक्षक पक्ष्यांनी, क्रव्यादानें ( आम- मांसभक्षक ) पक्ष्याने टाकिलेलें मांस शुद्ध. १९२ उजेडाचा किरण, अग्नि, धुराळा, छाया, गाय, घोडा, जमीन, वारा, पाण्याचा बंदु, स्पर्श करणारी माशी आणि पीत असतां गाईचें वासरूं हीं शुद्ध आहेत. १२३ शेळी आणि घोडा हे मुखाकडे शुद्ध; गाय मुखाकडे शुद्ध नाहीं; मनुष्याचे शरि- रापासून निघणारे मल हे अपवित्र; सूर्य आणि चंद्र यांचे किरणांनीं आणि वायूनें रस्ते शुद्ध होतात. १९४ मुखापासून निघणारे बिंदु व आचमनाचे बिंदु पवित्र; तोंडांत जाणारे मुखावरील केश शुद्ध; दांतास चिकटलेला पदार्थ दूर केल्यानें पुरुष पवित्र होतो. १९५ एक वेळ दंतशुद्धि केली तरी तीनंतर स्नानपान झाल्यास, शिंक, खोकला, आ- स्र्यास, निद्रा, खाणें, गाडींतून जाणें झाल्यास, किंवा पोषाख केल्यास, पुरुषानें पुनः दंत- शुद्धिकरावी. चांडाल, घोडा, किंवा कावळा यांनी स्पर्शिलेले रस्त्यांतील पाणी आणि चिखल, व भाजलेल्या विटांनी बांधलेलें घर ही केवळ वायूनेंच शुद्ध होतात. १९७ दानप्रकरण. ब्रह्मदेवानें तपश्चर्या करून वेदांचे संरक्षणासाठी, पितर व देव यांस तृप्त ठेवण्या- साठीं, व धर्मसंरक्षणाकरितां ब्राह्मणांस उप्तन्न केले. १९८ सर्वांत ( क्षत्रियादि शेवटचे तीन वर्णांत ) ब्राह्मण प्रमुख; त्यांमध्यें वेदाध्ययनांत