पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. ईबापांकडील ), ऋत्विज, पुरोहित, अपत्य, स्त्री, गुलाम, सपिंड,' इतक्यांशीं गृह- स्थाश्रम्यानें कलह न केल्यानें त्यास स्वर्गप्राप्ति आहे. १५७-१५८ [ पुढे सांगितलेल्या पाण्याच्या ठिकाणाशिवाय ] दुसऱ्याचे पाण्यांत [ पाण्याचे तळापासून ] मातीचीं पांच ढेकळे काढल्यावांचून स्नान करूं नये. नदी, देवनिर्मित [ पुष्करादि ] तलाव, डोह, व डोंगरांतील झरा यांत स्नान करावें. १५९ परवानगीवांचून दुसऱ्याच्या बिछान्यावर, आसनावर, किंवा बार्गेत, आणि घरांत किंवा वाहनांत बसूं नये. ज्याचे घरीं श्रौत स्मार्त अग्नि नाहीं, त्याच्या घरचें अन्न [गृहस्था- श्रम्यानें ] संकटप्रसंगावांचून खाऊं नये. १६० कृपण, प्रतिबंधांत असलेला, चोर, नपुंसक, नाटकी, बुरुड, नीच कर्म करणारा, फार व्याज घेऊन त्यावर उपजीविका करणारा, वेश्या, आणि बहुत लोकांबद्दल यज्ञ करणारा पुरुष; वैद्य, रोगी, रागावलेला मनुष्य, कुमार्गानें चालणारी स्त्री, दारू पिऊन वगैरे झिंगले- ला, शत्रु, क्रूर स्वभावाचा, बेफाम स्वभावाचा, जातिभ्रष्ट, संस्कारहीन, ढोंगी आणि इतरांचें उष्टें खाणारा; बहकलेली स्त्री, सोनार, स्त्रीचे स्वाधीन झालेला पुरुष, ग्रामयाज्ञिक, शस्त्रें विकणारा, लोहार, शिंपी, आणि कुत्री पाळणारा; दुष्कर्मी पुरुष, राजा, रंगारी, कृतघ्न पुरुष, खाटीक, धोबी, दारू विकणारा, आणि आपल्या स्त्रीच्या जारासहवर्तमान आपल्या घरांत राहणारा; पाठीमागून निंदा करणारा, खोटसाळ, तेली, भाट (स्तुतिपाठक ), आणि सोमव- ल्ली विकणारा, यांच्या घरचें अन्न घेऊं नये. शूद्र जातीपैकी गुलाम, गुराखी, वंशपरंपरेचा स्नेही, भागीने शेती करणारा आणि न्हावी यांचें अन्न गृहस्थाश्रम्यानें घ्यावें. तसेंच ज्यानें आपणास शरीर आणि मन हीं अर्प- ण केली असतील अशाकडील अन्न खाण्यास योग्य होय. [ स्नातकप्रकरण समाप्त. ] भक्ष्याभक्ष्यविचार. अवज्ञापूर्वक दिलेले अन्न, अयोग्य ( देव व पितर यांचा भाग न दिलेलें ), मांस, ज्यांत केश व कृमि आहेत तें, आमलेलें अन्न, शिळे अन्न, उष्टें, कुत्रा शिवलेले, नातिभ्र- ष्टाची नजर पडलेलें; १. बिज्ञानेश्वराच्या मतें 'सनाभिपदा' चा अर्थ 'सुवासिनी नाहीत अशा सख्ख्या बहिणी'.