पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. घोष चालत असतां, वेळू एकावर एक घांसून त्यांचा शब्द होत असतां, दुःखिताचें रोदनादि होत असतां, [ तसेंच ] मल, मूत्र, प्रेत, शूद्र, अंत्यज, स्मशानभूमि किंवा पतित यांपैकी कोणी जवळ असतां अध्ययन करूं नये. अपवित्र ठिकाणीं, स्वतः अपवित्र असतां, मेघगर्जना होत असतां, विजा चमकत असतां, भोजनानंतर हात आले असतां, पाण्यांत असतां, मध्यरात्री आणि वारा मोठ्या सोसाट्यानें वहात असतां [ अध्ययन करूं नये ]. १४९ वावटळीनें धुरळा उडत असतां, दिग्दाह होत असतां (ह्मणजे दिशा पेटल्यासारख्या दिसत असतां), दिवस आणि रात्र यांच्या संधिकालांत, धुके पडत असतां, संकटाचे वेळीं, धांवतांना, दुर्गंध येत असतां, किंवा कोणी प्रतिष्ठित पुरुष घरी आला असतां [ वेदा- ध्ययन करूं नये ]. १५० गाढव, उंट यांवर बसले असतां, गाडींतून जात असतां, हत्ती व अश्व यांवर बसलें असतां, होडींतून जातांना, झाडावर चढलेले असतां, ओसाड जमिनीत किंवा अरण्यांत असतां [ अध्ययन करूं नये ]. हे सदतीस सांगितलेले अनध्याय [ केवळ ] तात्कालिक ( ह्मणजे तीं तीं कृत्ये होत असतां मात्र करण्याचे ) असें [ ज्ञाते ] समजतात. १५१ देव, ऋत्विज, स्नातक ( वेदाध्ययन पुरें• ज्याचें झालें तो ), आचार्य, राजा, व स्वस्त्रीवांचून इतर स्त्री, यांची छाया वलांडून जाऊं नये; [ तसेच ] रक्त, मल, मूत्र, थुंकी आणि [ आंगास लावण्याचें ] उटणें वगैरे यांस वलांडूं नये. १५२ ब्राह्मण, सर्प, राजा, यांचा, तसाच आपला, अनादर कधीही करूं नये; आमरणांत संपत्तीची इच्छा करावी; कोणाचीही म बाहेर काढू नयेत. १५३ उच्छिष्ट अन्न, मल; मूत्र, आणि पाय धुतलेले पाणी [ घरापासून ] दूर टाकावें. वेद व स्मृति यांत सांगितलेले कर्म व उत्तम आचार नित्य आचरावे. १९४ उष्टयानें (ह्मणजे अपवित्र स्थितीत असतांना ), किंवा पायानें, गाय, ब्राह्मण, अग्नि आणि अन्न यांस स्पर्श करूं नये; त्यांची निंदा करूं नये; किंवा त्यांस लाथ मारूं नये. पुत्रास व शिष्यास [ जरूर झाल्यास ] शिक्षा करावी. कर्मानें, मनानें, आणि वाचेनें धर्माचें आचरण प्रयत्नेकरून करावें. जें लोकांस अमान्य आहे तें जरी सशास्त्र असेल, तरी त्यापातून स्वर्गप्राप्ति होणार नाहीं, ह्मणून तें करूं नये. आई, बाप, अतिथि, भाऊ [ सावत्र सुद्रां ], सुवासिनी स्त्रिया, संबंधी ( लग्नाचे द्वारें झालेले ), मामा, वृद्ध, अल्पवयस्क, रोगी, आचार्य, वैद्य, आश्रित बांधव ( आ- ३ ●