पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ याज्ञवल्क्यस्मृति. पायांचे तळवे किंवा पाय अप्नीवर वरून तापवूं नयेत; किंवा अग्नीवरून उडी मारून जाऊं नये. १३७ ओंजळीनें पाणी पिऊं नये; निजलेल्यास उठवूं नये ; फांशांनी खेळूं नये; धर्म- नाश करणाऱ्या (व्यर्थ पशु मारणे वगैरे कृत्यांनीं ) खेळूं नये; अथवा व्याधिग्रस्ताशीं निजूं नये. १३८ धर्माविरुद्ध कर्म करूं नये; प्रेताचा धूर घेऊं नये; पोहून नदीपलीकडे जाऊं नये ; केश, राख, कोंडा, कोळसा अथवा खापयांवर बसूं नये. १३९ [ क्षीरादि] पितांना माईस पाहिले तर त्याबद्दल कोणास सांगू नये ' ( त्या- बदल बभ्रा करूं नये ) ; कोणत्याही ठिकाणी द्वारावांचून जाऊं नये; शास्त्रमार्ग सोडून चालणाऱ्या धनलोभी राजापासून [ कांही एक ] घेऊं नये. १४० [ त्यांकडून ] दान घेण्याविषयीं खाटिक, तेली, दारू विकणारा, वेश्या आणि राजा हे पहिल्याहून दुसरा दसपट, दुसऱ्याहून तिसरा दसपट असे दोषी समजावे. १४१ ओषधि वाढून तयार झाल्या ह्मणजे वेदाध्ययनाचा आरंभ श्रावणशुद्ध पूर्णिमेच्या दिवशी किंवा [ दुसऱ्या तिथीस ] श्रवण नक्षत्रीं, किंवा श्रावणपंचमीस हस्त नक्षत्रों करावा. १४२ पौषमासाचे [ कृष्णपक्षाचे ] अष्टमीस किंवा [ त्या महिन्यांत ] रोहिणी नक्षत्रों गां- वाबाहेर पाण्याचे ठिकाणी वेदांचा उत्सर्ग शास्त्रांत सांगितलेल्या विधीनें करावा. १४३ शिष्य, ऋत्विज, गुरु, व माईचंद यांतील कोणी मृत झाल्यास, उपाकर्म व उत्सर्ग यानंतर, [ तसेंच ] स्वशाखेचा श्रोत्रिय मृत झाल्यास, तीन दिवस अनध्याय करावा. १४४ संध्यारागाचे समयीं मेवगर्जना झाल्यास, हवेंत मोठें चलनवलन झाल्यास, ( वावटळ वगैरे ), भूकंप झाल्यास, आकाशांतून तारे तुटून पडल्यास, तेव्हां; वेदांचें [ मंत्रभागाचें किंवा ब्राह्मणांचें ] अध्ययन पुरे झाले ह्मणजे तेव्हां; आणि आरण्यकांचें अध्ययन झाले ह्मणजे त्या वेळेस, अहोरात्र अनध्याय करावा. १४५ पूर्णिमा, चतुर्दशी, अष्टमी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, दोहों ऋतूंच्या संधीच्या वेळेस, श्राद्धभोजन केल्यास, किंवा श्राद्धसंबंधी [ प्रतिग्रह घेतल्यास ] एक दिवस अनध्याय करावा. पशु, बेडूक, मुंगूस, कुत्रा, सर्प, मांजर किंवा उंदीर यांतील कोणीहि एक अध्ययन करणाऱ्यांच्या मधून गेल्यास, तसेंच इंद्रध्वज उभारण्याचे व पाडण्याचे दिवशीं अहोरात्र अनध्याय करावा. १४७ कुत्रा किंवा कोल्हा भोकत असतां, गाढव किंवा घुबड ओरडत असतां, सामवेदाचा १ वीरमित्रोदयकार 'वांसरास पाजतांना गाय पाहिली तर ' असा अर्थ करतो, तो बरा दिसतो.