पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. करण्याच्या वृत्तीनें ) आपली उपजीविका करावी. ह्या [ वृत्तीनें राहणाऱ्या ब्राह्मणांमध्यें ] पश्चात्पठित अधिक श्रेष्ठ समजावा. १२८ स्नातकमकरण. वेदाध्ययनास प्रतिबंध होईल अशा रीतीनें द्रव्याची इच्छा धरूं नये ; [ तसेंच ] हवें तिकडून (हर कोणापासून ) द्रव्य घेऊं नये ; सदोष उपायांनीं द्रव्य मिळवूं नये; नेहेमी संतोषवृत्तीने रहावें. १२९ क्षुधेनें आर्त झालेल्या पुरुषानें राजापाशीं, शिष्यापाशीं, किंवा ज्याच्यासाठी तो यज्ञादि क्रिया करीत असेल त्यापाशीं द्रव्य मागावें. दांभिक (ढोंगी), हैतुक ( संशयी ), पाखंडी ( वेदविरुद्ध मार्गाचें अवलंबन करणारा), आणि बकवृत्ति ( ठकबाजी करणारा ) यांस वजीवें ( ह्यांपासून द्रव्य घेऊं नये ). १३० शुभ्र वस्त्र धारण करावीं; डोक्यावरचे व तोंडावरचे केंस व नखे काढवावीं; शुद्ध असावें ; स्वभार्येच्या समोर बसून भोजन करूं नये; एकच वस्त्र आंगावर असतां, तसेंच उभ्यानें भोजन करूं नये. १३१ आपले जिवास धोका होण्याजोगें काम करूं नये; योग्य हेतूवांचून कोणासही कठोर भाषण, अहित भाषण, व खोटें भाषण बोलूं नये; चोरी करूं नये; व ज्यास्ती व्याज घेऊन त्यावर उपजीवन करूं नये. १३२ सोनें [ सोन्याचा अलंकार ] आंगावर धारण करावें; ब्रह्मसूत्र धारण करावें; दंड व कमंडलु हे धारण करावे ; आणि देव, पृथ्वी, गाय, ब्राह्मण व [ वडपिंपळादिक ] वनस्प- ति यांना उजव्या बाजूस टाकून जावें. १३३ नदी, छाया, मार्ग, गुरांचा गोठा, पाणी, भस्म यांत मलमूत्रोत्सर्ग कधीं करूं नये; व [ मलमूत्राचे उत्सर्गाच्या वेळेस ] अग्नीकडे, सूर्याकडे, गाईकडे, चंद्राकडे, [ सकाळच्या किंवा संध्याकाळच्या ] संध्यारागाकडे, पाण्याकडे, स्त्रीकडे, अथवा द्विजाकडे तोंड करून बसू नये. १३४ सूर्याकडे, नग्न स्त्रीकडे, मैथुन करून उठलेल्या स्त्रीकडे, मूत्र व पुरीषांकडे पाहू नये; तसेंच अशुचि असतां राहूकडे आणि नक्षत्रांकडे पाहूं नये. १३५ पाऊस पडत असतां " अयं मे वज्रः " [ या अक्षरांस आरंभ करून जो मंत्र आहे तो ] सर्व मंत्र जपीत होत्साता वस्त्रावांचून हळू हळू चालावें ; व पश्चिमेकडे डोकें करून कधीं निजूं नये. १३६ थुंकी, रक्त, पुरीष, मत्र आणि रेत हीं त्यानें पाण्यांत [ किंवा अग्नींत ] टाकूं नयेत;