पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. क्षत्रियाचा मुख्य धर्म ह्मणजे प्रजांचें पालन करणे [ हा होय ]; व्याजानें पैसा दे - णें, शेतकी आणि व्यापार करणे व गुरे राखणे हीं कर्मे वैश्याची [ मुख्य धर्म ह्मणून ] सांगितलेली आहेत. १४ ११९ द्विजांची ( ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची ) चाकरी करणे हा शूद्राचा [ मुख्य धर्म होय ]. पण त्यावर त्याचा निर्वाह न झाल्यास त्याने व्यापारधंदा करावा; आगे द्विज- जातीचें हित करित होत्साता नानाप्रकारच्या कारागिरीची कामे करून त्याने निर्वाह क रावा. १२० [ गृहस्थाश्रम्यानें ] स्वभार्येशीं मात्र रत असावें, [ अंतर्बाह्य ] पवित्र रहावें, नोकर श्राद्धक्रिया कराव्या, वगैरे आपणावर अवलंबून राहणाऱ्यांचे सर्वस्वी चालवावें, . [ असें पद उच्चारून किंवा ' देवताभ्यः पितृभ्यश्च ० ' या 1 मंत्राने पंचमहायज्ञ कर- ण्यास कधींही चुकूं नये. १२१ प्राणघात न करणे, सत्य, चोरी न करणें, शुचिर्भूतपणा, व इंद्रियांचा निग्रह करणे, दान करणे, [ मनाचा किंवा कामक्रोधांचा ] निग्रह करणें, दया व क्षमा हीं सर्वांस पुण्याचीं साधनें आहेत. १२२ आपले वय, बुद्धि, धन, वाणी, वेष, शास्त्र, कुल व धंदाउद्योग यांस अनुरूप वर्तणूक ठेवावी; तींत वांकडेपणा किंवा लवाडी असू नये. १२३ तीन वर्षांपेक्षा जास्ती काळ पुरण्याजोग्या अन्नाचा पुरवठा ज्यापाशीं असेल अशा द्विजानें सोम [ वल्लीच्या ] रसाचें पान करावें ( सोमयाग करावा ). ज्या द्विजाजवळ एक वर्षाची अन्नाची बेगमी आहे, त्यानें सोमयागाच्या पूर्वीच्या क्रिया करा- व्या. " व नमः , १२४ प्रतिवर्षी सोमयाग करावा; दर साहा महिन्यांस [. दक्षिणायन उत्तरायणांत ] पशुयज्ञ करावा; तसेंच आग्रयणेष्टि ( नवान्नेष्टि ) आणि चातुर्मास्यें ही करावीत. १२५ [ पूर्वी सांगितलेले ] यागादिक करण्याचा संभव नसेल, तर द्विजाने वैश्वानरी इष्टि करावी; कांहीं एक विशेष फलप्राप्तीच्या हेतूनें यज्ञ करणें तो द्रव्य असतां अल्प खर्चानें करूं नये. १९२६ शूद्रापासून पैशाची भिक्षा मागून घेऊन जो यज्ञ करतो तो चांडाल होतो; यज्ञा- साठी जे [ द्रव्यादिक ] मिळालेले असेल तें सर्व [ यज्ञांत ] जो देत नाहीं ( खर्चित नाहीं), तो गिधाड किंवा कावळा होतो. १२७ कुमूलधान्य, कुंभीधान्य, व्याहिक, आणि अश्वस्तन ( ज्यांचे घरीं अनुक्रमानें १२,६, ३ आणि १ दिवसांपुरतें शिल्लक असते ते ) गृहस्थाश्रमी यांनीं शिलो- ज्छेनें ( धन्यानें धान्य कापून नेल्यावर पडलेली कणसें किंवा दाणे निवडून निर्वाह