पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. १३ . संन्याशी व ब्रह्मचारी यांस, त्यांचा सत्कार करून भिक्षा द्यावी. मित्र, भाऊबंद भोजनाचे वेळेस येतील तर त्यांस भोजनास घालावें. नातलग, १०८ श्रोत्रिय [ वेदवेत्त्या ] ब्राह्मणाला एक मोठा बैल किंवा बकरा द्यावा; तसेंच त्याचा सत्कार करावा; त्यास प्रथम बसवून नंतर आपण बसावें; त्यास गोडगोड पदार्थांचें भोजन घालावें व त्याशीं मधुर भाषण करावें. स्नातक (विद्यासंपादन पुरे करून स्नान करणारा ), आचार्य, राज्यकर्ता, स्नेही, व जांवयी यांचें मधुपर्कानें दर वर्षी पूजन करावें; आणि ऋत्विजांचें प्रत्येक यज्ञाचे प्रसंगीं [ मधुपर्कानें पूजन करावें. ] ११० पांथस्थास अतिथि ह्मणावें. श्रोत्रिय ( सर्व वेद जाणणारा ), [ व ] वेदपारग हे दोघेही ब्रह्मलोक मिळावा अशी इच्छा करणाऱ्या गृहस्थाश्रम्यास आदरणीय [ अतिथि होत ]. १११ शुचि पुरुषांकडून आमंत्रण आल्यावांचून दुसऱ्याच्या घरच्या अन्नाची रुचि ( जेव- ण्यास जाण्याची इच्छा ) असूं नये; भाषण, हात, आणि पाय यांचें चांचल्य आणि अधाशीपणानें खाणें हीं [ आतिथीनें ] वर्जावीं. ११२ तृप्त झालेले श्रोत्रिय अतिथ्यास सीमेपावेतों पोंचवावें; शिष्ट, स्नेही व भाऊबंद यांच्याशी राहिलेला दिवस [ गृहस्थाश्रम्यानें ] घालवावा. ११३ सायंसंध्या करून, अग्नीचा होम व त्याची उपासना करून, नंतर चाकरांसह- वर्तमान विशेष तृप्ति न करणारें असें भोजन करून निजावें. ११४ ब्राह्ममुहूर्ती ( पाहांटेची चार घटका रात्र राहिली असतां ) उठावें, आणि आपल्या आत्म्यास जे इष्ट त्याचं चिंतन करावें; कर्तव्य, धनप्राप्ति, सुर्खे, [ हीं ] आपल्या शयनु- सार योग्य कालीं [ संपादण्याचे काम सोडूं नये. ] १११ विद्या, कर्मे ( श्रौतस्मातादिक ), वय, भाऊबंद आणि घन यांहीं युक्त पुरुष अनुक्रमानें मान्य आहे (विद्वानास प्रथम मान, दुसऱ्यानें श्रौतादि कर्मे कर्त्यास वगैरे ). यांहीं युक्त शुद्रही वृद्धपणी मानास पात्र होतो. ११६ वृद्ध, भार वहाणारा, नृप, ब्रह्मचर्यव्रत पुरे करून जो स्नात, स्त्री, रोगी, नवरा- मुलगा, व गाडीवाला यांस [ रस्त्यांतून चालणाऱ्यानें ] मार्ग द्यावा; त्यांत राजाला [ इत- रांहून ] पूर्वी मान मिळावा, आणि वेदाध्ययन परिपूर्ण करून जो स्नात आहे तो ( विद्या- संपन्न पुरुष ) राजासही पूज्य ( राजानेही त्याला मान द्यावा ). ११७ यज्ञकर्म, अध्ययन आणि दान हीं वैश्यास व क्षत्रियास [ नेमिलेली कृत्यें होत ]; दान घेणें, यज्ञक्रियेंत आर्त्विज्य करणे, आणि [ वेद ] पढविणें हीं कमैं [ वरील वैश्य व क्षत्रियांस सांगितलेल्या कर्माशिवाय ] ब्राह्मणास ज्यास्ती [ नेमिलेली ] आहेत. ११८