पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ याज्ञवल्क्यस्मृति. गृहस्थप्रकरण. गृहस्थाश्रम्यानें प्रत्यहीं स्मृत्युक्त कर्म विवाहकालीं सिद्ध केलेल्या अग्नीवर किंवा दायभाग ( वडिलार्जित मिळकतीचा हिस्सा ) घेतल्यावर सिद्ध केलेल्या अग्नीवर करावें; आणि वेदोक्त कर्म वैतानिक ( गार्हपत्यादि जे तीन त्या ) अग्नीवर करावें. शारीर व्यवस्थेच्या संबंधानें पूर्वोक्त ( श्लोक ) विधि प्रथम उरकून नंतर द्विजानें [ मलमूत्रोत्सर्गादिक ] शरीरशुद्धीचे विधि करावे. [ पुढें ] दंतधावन करून प्रातःसंध्येचा विधि करावा. ९८ अग्नीवर होम करून आपली मनोवृत्ति सुस्थितीवर आणावी आणि सूर्यदेवताप्रधा- न मंत्रांचा जप करावा; पुढें वेदार्थाचें व निरनिराळ्या शास्त्रांचें अध्ययन करावें. ९९ योगक्षेमसिद्धि व्हावी ( ह्मणजे जें अलब्ध ते मिळावें व मिळालेले रहावें ) या- साठीं ईश्वराचे सन्निध जावें. नंतर स्नान करून देवांचें व पितरांचें तर्पण उदक- दानानें करावें. • १०० जपकर्म परिपूर्ण व्हावें ह्मणून स्वशक्तीप्रमाणे [ ऋगादिक तीन ] वेद, [ व चवथा ] अथर्व वेद, पुराणें, इतिहास यांचे पठन करावें; तसेच अध्यात्मविद्येचेंही चिंतन करावें. १०१ भूत, पितर, देव, ब्रह्म (वेद), आणि मनुष्य, [ या पांचांस उद्देशून ] महायज्ञ [ अनुक्रमानें हे होत ]:-( १ ) बलिकर्म [ अन्नाचें बलिहरण करणें ], ( २ ) स्वधाशब्द- पूर्वक पितरांस उद्देशून अन्नदान किंवा उदकदान करणें, ( ३ ) अग्नीवर अन्नाची आहु- ति देणें, ( ४ ) वेदांचें पठन, ( ५ ) पाहुण्यांचें आदरातिथ्य करणे. ५ १०२ देवांसाठी अनीत आहुति दिल्यावर जे शेष अन्न राहील त्याचा भूतवाल द्यावा; नंतर कुत्रे, चांडाल, व कावळे यांचेसाठी अन्न भूमीवर ठेवावें.. १०३ पितर आणि मनुष्य यांस अन्न व पाणी [ दोन्ही ] दररोज द्यावीं; तसेंच वेदाध्य- यनही दररोज करावें. केवळ स्वतःसाठी पाकनिष्पत्ति करूं नये. १०४ मुलें, सभर्तृक माहेरवाशिणी, वृद्ध माणसें, गर्भिणी, रोगी, लग्न न झालेल्या मुली, पाहुणे आणि नोकर यांस चांगल्या रीतीनें प्रथम भोजनास घालावें; व नंतर जें बाकी राहील ते नवराबायकोनीं खावें. १०५ द्विजानें प्रारंभी आणि शेवटी आपोशन करून अन्न आच्छादित ष अमृतस्वरूप करावें. [ आपले घरीं ] येणाऱ्या चारही वर्णांच्या अतिथींस वर्णाचे अनुक्रमाप्रमाणे शत्त्य- नुसार देणगी द्यावी; संध्याकाळी अतिथि आला तरी त्याला परत लावूं नये; [ अन्न नस- ल्यास निदान ] त्याशीं चांगले शब्द बोलावे व जागा, गवत, व पाणी ही द्यावीं. १०७