पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. ११ अनेक वर्णांच्या भार्या पुरुषास असल्यास आपल्याहून भिन्न वर्णाच्या स्त्रीकडून त्याने [ सहाधिकारप्राप्त ] धर्मकृत्यें करवूं नयेत. स्ववर्णाच्या स्त्रियांत जी सर्वांत वडील असेल तिनेंच धर्मविधि करावे, अन्य स्त्रीनें करूं नयेत. ८८ स्वधर्मानें चालणारी पत्नी [ मरण पावल्यास ] नवयानें अग्निहोत्राच्या अग्नीनें तिचें दहन करावें. [ नंतर ] विलंब न करतां दूसरी पत्नी सशास्त्रमार्गांनी करून पुनः अग्निहोत्र घ्यावे. ८९ वर्णजातिविवेकप्रकरण. समजातीय स्त्रीपुरुषांचा शास्त्ररीतीनें विवाह होऊन त्यापासून झालेले होत; व असे पुत्र कुलाची वृद्धि करणारे समजावे. पुत्र सजातीय ९० , ब्राह्मणापासून क्षत्रिय जातीच्या स्त्रीस झालेला पुत्र' मूर्द्धावषिक्त;' वैश्य जातीचे स्त्रीस झालेला ' अंबष्ठ '; शूद्र जातीचे स्त्रीस झालेला तो 'निषाद ', ' किंवा पारशव. ९१ क्षत्रियपुरुषापासून वैश्य आणि शूद्र जातींच्या स्त्रियांस झालेल्या पुत्रांस [ अनुक्रमा- नें ] ‘माहिष्य,' व 'उग्र' [ असं ह्मणतात ]. वैश्यापासून शूद्र स्त्रीस झालेला तो 'करण'. हे नियम शास्त्रोक्त लग्नसंस्कार झालेल्या स्त्रियांपासून झालेल्या पुत्रांविषयीं समजावे. ९२ क्षत्रियापासून ब्राह्मणी स्त्रीला झालेला मुत्र ' सूत; ' वैश्यापासून तिला झालेला पुत्र तो ‘वैदेहक;’ व शूद्रापासून झालेला तो 'चांडाल'; हा चांडाल सर्व धर्मातून बाहेर टाकलेला [ असा समजावा ]. ९३ क्षत्रिया स्त्री वैश्य पुरुषापासून जो पुत्र उत्पन्न करते त्यास 'मागध'; शूद्रापासून करिते त्यास 'क्षना;' आणि वैश्या स्त्री शूद्र जातीचे पुरुषापासून जो उत्पन्न करते त्यास ' आयोगव ' [ असें ह्मणावें ]. ९४ करण जातीचे स्त्रीस माहिष्य जातीचे पुरुषापासून जो पुत्र होतो तो 'रथकार; प्रतिलोम ( ह्मणजे नीच जातीचे पुरुषापासून उच्च जातीचे स्त्रीस झालेले ) पुत्र हे वाईट सम- जात्रे; आणि अनुहोम ( ह्मगने उच्च वर्णाचे पुरुषापासून नीच वर्णाचे स्त्रीस झालेले ) हे चांगले समजावे. असे समजावें कीं, वर सांगितलेल्या जातींचा उत्कर्ष सातव्या किंवा पांचव्या जन्मांतही होतो ( ह्मणजे नीच जातीचा पुरुष उच्च जातीचा होतो ); [ पण ] ज्ञातिधर्माचे विरुद्ध आचरण केल्यास [ ज्या ज्ञातीचे धर्म स्वीकारावे त्या ज्ञातीचे ] बरोबरीचा कम- जातीचा होतो; मिश्र जातींत ब्राह्मणापासून झालेली संतति [ वर सांगितल्याप्रमाणे ] उच्च किंवा नीच होते..