पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० याज्ञवल्क्यस्मृति. निरनिराळे [ चंद्रलोक, सूर्यलोक, वगैरे ] लोक, त्यांतील अनंत सुख व स्वर्ग यांची प्राप्ति [ अनुक्रमानें ], पुत्र, पौत्र, प्रपौत्र, यांचे द्वाराने होणारी आहे, त्या अर्थी स्त्रियांचा उपभोग घ्यावा व त्यांना जपावें. ७८ स्त्रियांचा ऋतुकाळ [ ऋतुदर्शनापासून सोळा रात्रीपावेतों ] असतो. त्या दिव- सांत [ सहा, आठ अशा ] सम रात्रीं स्त्रीसंभोग करावा; पर्वे आणि पहिल्या चार रात्री टाकाव्या. अशा नियमानें चालणारा ब्रह्मचारीच [ समजावा ]. ७९ मघा नक्षत्र व मूल नक्षत्र हीं वर्जित करून चंद्र अनुकूल ठिकाणी असतां [ जो पुरुष ] पातळांग्या स्त्रीशीं गमन करील त्याला सुलक्षणयुक्त पुत्र लौकर होईल. ८० किंवा स्त्रियांस [ इंद्रानें ] दिलेला वर स्मरून पुरुषानें स्त्रीचे इच्छेप्रमाणें वागावें, व त्यानें स्वस्त्रीशींच निरत असावें; कारण की स्त्रिया जएण्यास योग्य होत, असे मटलेले आहे. भर्ता, भाऊ, पिता, ज्ञाति (ह्मणजे संबंधी लोक), सासु, सासरा, दीर, आणि [पारिभा- षिक ] बंधु इतक्यांनीं भूषण, वस्त्रे, अन्ने स्त्रियांस देऊन त्यांचा सन्मान करीत जावें. ८२ [ स्त्रीनें घरांतील वस्त्रपात्रादिक ] वस्तु व्यवस्थेनें ठेवाव्या, संसारकृत्यांत दक्ष असावें, आनंदवृत्तीनें रहावें, व्यर्थ खर्च करूं नये, व पतीच्या अधीन राहून सासरा व सासू यांचें चरणवंदन करीत जावें. देशांतरीं गेलेल्या नवऱ्याच्या बायकोनें [ चेंडू वगैरेंनी ] खेळणें, [ उटी, वस्त्राभर- णांनी वगैरे ] शरीर भूषित करणें, पुरुषांची मंडळी व उत्सवादिक पाहणे, हसणे, पराचे घरी जाणें, हीं करूं नयेत. कन्यादशेंत असतां बापानें, विवाहानंतर भर्त्यानें, वृद्धपणीं पुत्रांनीं, हे नसतील तेव्हां, ज्ञातींनी, स्त्रियांचे रक्षण करावें; कोणत्याही अवस्थेत स्त्रीला स्वातंत्र्य नाही. ८५ भर्त्याशीं जिचा वियोग झाला त्या स्त्रीनें पिता, माता, पुत्र, बंधु, सासू, सासरा किं- वा मामा यांच्या आश्रयावांचून राहूं नये. अशा रीतीनें न राहील तर ती स्त्री निर्देस पात्र होईल. आपल्या नवऱ्याचें जें आवडतें तें करण्यांत जी तत्पर, जिचा आचार चांगला, जिणें इंद्रियवृत्ति जिंकल्या अशी स्त्री या लोकांत कीर्ति पावते व तिला मरणानंतर उत्तम गति प्राप्त होते. ८७ १ येथे लोकप्राप्ति, आनंत्य, अशा दोन कोटी न करतां लोकानंत्य ह्मणजे ' या लोकी अविच्छिन्न वंश ' असा अर्थ विज्ञाने धराने केला आहे. परंतु अ० ९ श्लो० १३७ या मनुवचनाशीं एकवाक्यता करण्यासाठी वर लिहिल्याप्रमाणें मी दोन कोटी पृथक् केल्या आहेत.