पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. जी आपल्या नवन्यास सोडून देऊन आपल्या सवर्ण पुरुषाशीं स्वेच्छेनें रत होऊन राहते तिला स्वैरिणी [ ह्मणतात ]. जिला पुत्र नाही अशा भावजयीशीं तिला पुत्रप्राप्ति व्हावी ह्मणून दिरानें, सपिंड पुरुषानें, किंवा सगोत्र पुरुषानें, गुरूची आज्ञा घेऊन, अंगास घृत लावून तिच्या ऋतुकालीं जावें. तिला गर्भधारण होईपावेतो मात्र जावें, अन्यथा ( गर्भधारणानंतर गेल्यास ) तो [ जाणारा ] पतित होतो. या विधीनें झालेला पुत्र त्याचा ( पूर्वपतीचा 'क्षेत्र- जपुत्र '. 6 व्यभिचार करणाऱ्या [ स्त्रीचा भृत्यादिकांवरील ] अधिकार काढावा, तिला मळीण राहू द्यावें, शरीर चालण्यापुरते मात्र अन्न द्यावें, तिला मान देऊं नये आणि शय्येवर निजूं देऊं नये. ७० स्त्रियांस चंद्रानें स्वच्छपणा दिला, गंधर्वानें गोड वाणी दिली, अग्नीनें परिपूर्ण शुचि- भूतपणा दिला, ह्मणून स्त्रिया ह्या खचित शुद्ध आहेत. ७१ व्यभिचारापासून [ झालेल्या पातकाची किंवा मलिनतेची शुद्धि ] ऋतुकालीं होते. व्यभिचारापासून स्त्रीस गर्भधारणा झाल्यास, गर्भवध किंवा भर्तृवध स्त्रीनें केल्यास, [ किंवा दुसरे एकादें ] महत् पातक केल्यास तिचा त्याग करावा. ७२ मद्य पिणारी, [ दीर्घ ] रोगी, कृत्रिमी, वंध्या, द्रव्याचा नाश करणारी, निष्ठुर बो- लणारी, किंवा जिला नेहेमीं मुलचि होतात, तसेंच जी नवऱ्याचा द्वेष करते तिला मार्गे टाकावी ( दुसरी बायको करावी ). ७३ जरी मागें टाकिली तरी तिचें परिपोषण केलेच पाहिजे; तसें न केल्यास मोठें पा तक घडतें. जेथें स्त्री आणि पुरुष हीं उभयतां एकविचारी असतात तेथें त्रिवर्ग ( धर्म, अर्थ, आणि काम ) वाढतो. ७४ स्वपति जिवंत असतां किंवा मृत झाल्यानंतर जी स्त्री अन्य पुरुषासमीप देखील जात नाहीं तिची या लोकीं कीर्ति होऊन [ पुढें ] ती पार्वतीसह आनंद भोगते. नवऱ्याच्या आज्ञेप्रमाणे चालणारी, [ संचारकार्यांत ] दक्ष, पुत्रवती, आणि गोड भाषण करणारी अशा स्त्रीचा [ भर्त्यानें ] त्याग केल्यास त्याचे सर्व मालमत्तेचा तिसरा हिस्सा [ राजानें ] तिला देववावा. नवरा गरीब असल्यास त्याजकडून तिचें पोषण कर- वाव ( अन्नवस्त्रादि देववावें ). ७६ स्त्रीनें भर्त्याच्या वचनाप्रमाणे चालावें; त्रिपांच्या सर्व धर्मात हा उत्तम धर्म [ होय ]. [ कांहीं ] महापातकादिकानें नवरा दूषित झाला असल्यास त्याच्या शुद्धी- पावेतों [ स्त्रीनें ] वाट पहावी. ७७ २