पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. [ ह्मणावें ]. असा विवाह झालेल्या स्त्रीपासून झालेला पुत्र [ मागील पुरुष ] सहा, पुढील सहा, आणि आपण [ मिळून तेरा ] पुरुष पवित्र करतो. [ मुलीचे बापाने मुलाचे बापाकडून ] द्रव्य घेऊन जो विवाह होतो तो 'आसुर विवाह'; स्त्री व पुरुष या उभयतांचे एक विचाराने (परस्पर प्रीतीनें ) जो विवाह होतो तो ‘गांध- र्वविवाह'; युद्धांत कन्याहरण करून तिच्याशी केलेला विवाह तो 'राक्षसविवाह'; आणि कन्येस फसत्रून तिच्याशों जो विवाह केला जातो तो ' पैशाच विवाह ' [ होय ]. जेव्हां [ कन्या आणि वर हे ] एकाच वर्णाचे आहेत तेव्हां वरानें [ कन्येचा ] हात घरावा; ब्राह्मणाबरोबर क्षत्रियकन्या विवाह करील तर त्या क्षत्रियकन्येनें ब्राह्मणानें आपल्या हस्तांत धारण केलेला जो शर ( बाण ) त्याचा एक प्रदेश पाणि- ग्रहणस्थानी हात धरण्याबद्दल धरावा. ब्राह्मण अथवा क्षत्रिय यांच्याशी वैश्यकन्येचा विवाह असतां त्यानें स्वहस्तांत धारण केलेला जो प्रतोद ( चाबुक ) त्याचा एक देश वैश्य- कन्येनें धरावा. बाप, ६२ बापाचा बाप, वडील भाऊ, पितृसंबंधाकडील पुरुष ( सापेंड, सगोत्र, वगैरे), आणि आई यांस प्रत्येकीं, आपल्या ज्ञानेंद्रियवृत्तीवर असतां, कन्या देण्याचा अधि- कार आहे. पहिला नसल्यास दुसरा, दुसरा नसल्यास तिसरा या क्रमानें [ अधि- कारी समजावे ]. [ कन्या देण्याचा अधिकार असून ] जो विवाहसंस्कारानें कन्या देणार नाहीं तो [ अशा कन्येच्या ] प्रत्येक ऋतुकाळी भ्रूणहत्या [ बालहत्या ] पातकाचा दोषी होतो. कन्यादान करण्यास अधिकारी कोणी नसल्यास कन्येनेंच स्वतः योग्य वर शोधून लग्न करावें ( स्वयंवर करावा ). ६४ कन्या एक वेळ दिली जाते. दिल्यावर जो तिचे हरण करील तो चोराचे शिक्षेस पात्र होतो. [ परंतु पहिल्यापेक्षां ] विशेष चांगला वर येईल तर कन्या दिलेली असली तरीहि [ सप्तपदीचे पूर्वी ] परत घ्यावी. ६१ जो पुरुष कन्येचे [ उघड ] दोष स्पष्ट केल्यावांचून कन्या देतो तो उत्तम साहसा- स जो दंड [ ह्म० १०८० पण ] त्यास पात्र होतो; [ कन्येला ] दोष नसतां तिची स्त्री- कार करून नंतर तिला टाकल्यास, टाकणारास तोच दंड; खोटसाळपणानें जो कन्येस दोष ठेवतो त्यास शंभर [ पण दंड ]. जिचा पुनः [ विवाह ] संस्कार झाला तिला पुनर्भू [ही संज्ञा आहे ] मग ती क्षता [ ह्मणजे पुरुषाशी संबंध झालेली ] किंवा अक्षता [ पुरुषाशी संबंध न झालेली ] असो १ त्यजन् कन्यां या ठिकाणीं त्यजन् दण्डयो असाही पाठभेद आहे.