पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. विवाहमकरण. जीस चांगलीं लक्षणे आहेत, पूर्वी जी कोणास दिलेली नव्हे, अथवा जिचा पूर्वी कोणी उपभोग घेतलेला नाहीं, दिसण्यांत सुरेख, सपिंड संबंधांतील नव्हे, वयानें [ स्वतां- पेक्षां ] लहान, जिला कांहीं एक रोग नाहीं, जिला भाऊ आहेत, गोत्र आणि प्रवर जिचे [ स्वतांहून ] भिन्न आहेत व मातृसंबंधाकडून पांच पिढ्यांनी आणि पितृसंबंधा- कडून सात पिढ्यांनी जी दूर अशी कन्या, ज्याचे ब्रह्मचर्यव्रताचा भंग झालेला नाहीं अशा [ पुरुषानें ] वरावी. ५२-५३ [ दोन्ही बाजूंचे पांच पांच मिळून ] दहा पुरुष ज्यांचे विख्यात अशा मोठ्या वि- द्वान् पुरुषांचे कुळांत उत्पन्न झालेली कन्या असावी. परंतु इतक्या गुणांनी युक्त असूनही जर ती परंपरागत आलेल्या रोगानं युक्त कुळांतली असेल तर ती करूं नये. ५४ [ नवरा मुलगा ] याच गुणांनी युक्त, त्याच वर्णाचा, वेद जाणता, तरुण, बुद्धिमान, लोकप्रिय, व ज्यास पुरुषत्व आहे अशाबद्दल पक्की परीक्षा केलेला, असा असावा. द्विजानें शूद्र जातीची स्त्री वरावी असे आहे ( अर्से कांही ऋषींचें मत आहे ), पण माझे मत तसे नाही, कारण कीं तेथें [ शूद्रीचे ठायीं ] स्वतः [ द्विज ] पुत्ररूपाने उत्पन्न होतो [ हा दोष होय ]. ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य यांस वर्णक्रमानें, तीन, दोन, व एक भार्या अर्से क्र- मानें सांगितलेले आहे, [ ब्राह्मणास-ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य जातीच्या; क्षत्रियास- क्षत्रिय आणि वैश्य जातीच्या; आणि वैश्यास वैश्यजातीची ]; शूद्रास स्वजातींत उत्पन्न झाली असेल तीच स्त्री. [ कन्येच्या पित्याच्या ] शयनुसार वस्त्रालंकारांनी भूषित करून [ वरास ] बो- लावून आणून ज्या विवाहांत कन्या दिली जाते तो 'ब्राह्म विवाह. ' अशा कन्येपासून जो पुत्र उत्पन्न होतो तो मागील आणि पुढील मिळून एकवीस पुरुषांस ( मागील दहा, पुढील दहा, आणि स्वतः मिळून ) पवित्र करतो. यज्ञांत बसलेल्या ऋत्विजास [ ज्या विवाहांत कन्यां दिली जाते त्या विवाहास ] ‘ दैव विवाह’ ; आणि [ ज्या विवाहांत ] एक बैल आणि एक गाय [ वराकडून कन्ये - च्या बापास ] दिली जाते [ व नंतर कन्यादान होतें] त्यास ' आर्ष विवाह ' [ ह्मणावें ]. प्रथमापासून ( दैव विवाहापासून ) झालेला पुत्र चौदा पुरुष, व दुसन्यापासून ( आर्ष वि- वाहापासून ) झालेला पुत्र सहा पुरुष पवित्र करतो. ५९ तुझी उभयतांनी मिळून धर्माचरण करावें असें ह्मणून जेव्हां [ मागणाऱ्या ] व- रास बापाकडून कन्या दिली जाते त्या विवाहास ' काय विवाह ' [ प्राजापत्य विवाह ]