पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. ऋक् (ह्मणजे ऋग्वेद) याचें जो द्विज दररोज [ ब्रह्मयज्ञांत ] पठण करतो त्यास मध व दूध यांनीं देवांची, आणि मध व तूप यांनीं पितरांची [ आई बाप वगैरे पितृ- स्वरूप झालेले संबंध्यांची ] तृप्ति केल्याचें श्रेय येते. जो [द्विज] स्वतांच्या शक्तीप्रमाणे प्रत्यहीं [ ब्रह्मयज्ञांत ] यजुर्वेदाचे पठण करतो. तो घृत व अमृत यांनी देवांचें, आणि मध व घृत यांनीं पितरांचें प्रिय ( तृप्ति) करतो [ अर्धे समजावें ]. ४२ जो [ द्विज] प्रत्यही ब्रह्मयज्ञांत सामवेदाचें पठण करतो तो सोमवल्लीचा रस व घृत यांनी देवांची, आणि मध व धूत यांनीं पितरांची तृप्ति करतो असे [ समजावें ]. ४३ आपल्या शक्तीच्या मानानें जो द्विज अथर्वण वेद आणि आंगिरस (अथर्वण वेदा- चाच एक भाग ) यांचें प्रत्यहीं [ ब्रह्मयज्ञांत ] पठण करतो तो मेदानें [ चर्बीनें ] देवांची, आणि घृत व गंध यांनीं पितरांची तृप्ति करतो [ असे समजावें ]. ४४ वाकोवाक्य (प्रश्नोत्तररूपगनें वेद आहे तो), पुराणें ( त्राह्मादि), धर्मशास्त्रे (मानवा- दि), नाराशंसी (रुद्रदेवतेपर मंत्र), गाथा (गद्यरूपानें देवतांच्या स्तुतिपर जो वेदभाग तो), इतिहास (महाभारतादि), विद्या (शास्त्रे) यांचें जो द्विज आपल्या शक्त्यनुसार प्रत्यहीं [ ब्रह्मयज्ञांत ] पठण करतो तो मांस, दूध, भात, व मध यांनी देवांची, व मध आणि तूप यांनीं पितरांची तृप्ति करतो. ४५-४६ ते [ देव,पितर ] तृप्त होत्साते इच्छिलेली सर्व शुभ फळे देऊन यास [वर सांगित- लेल्या अध्ययनकर्त्या द्विजास ] तृप्त करतात; ज्या ज्या ऋतूचें (यज्ञोपयोगी मंत्रांचें ) हा [[द्विज] अध्ययन करतो त्या त्या क्रतूचें [ यज्ञाचें ] फळ त्यास प्राप्त होतें. जो द्विज नित्य [ ब्रह्मयज्ञांत ] वेदाध्ययन करतो तो द्रव्यांनी परिपूर्ण अशा पृथ्वी- च्या त्रिवार दानाचें फळ भोगतो; व त्यास अत्यंत मोठ्या [ चांद्रायणासारख्या तपाचें ] फल प्राप्त होतें. ४८ नैष्ठिक [ कधींच लग्न न करण्याचा ज्याचा निश्चय आहे तो ] ब्रह्मचाऱ्याने आप- ल्या आचार्याचे जवळ असावें, आचार्य नसतां त्याचे मुलाजवळ, मुलगा नसल्यास आचा- र्याचे पत्नीचे सन्निध, आचार्यपत्नी नसतां अग्निसंनिहितं [ रहावें ] ४९ सर्व इंद्रियांस जिंकून ब्रह्मचाऱ्याने या रीतीनें देह झिजविल्यास तो ब्रह्मलोकास जातो; त्यास पुनः जन्म होत नाहीं. समावर्तन [ सोडमुंज ], वेदाध्ययन पुरे करून किंवा व्रते ( ब्रह्मचान्यास जी उक्त आहेत तीं ) समाप्त करून किंवा दोन्ही पुरी करून व गुरूस त्यानें मागितलेलें [ इष्टदक्षि- णादिक ] देऊन गुरूचे आज्ञेनें [ ब्रह्मचाऱ्यानें ] स्नान करावें. ५१ १ आचार्याचा किंवा तदभावे स्वतःया अभि.