पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. क्षत्रियानें ‘भिक्षां भवति देहि' ; आणि वैश्यानें 'भिक्षां देहि भवति', असें भिक्षां देहि'; ह्मणावें ]. ३० [ होमादिक ] अग्निकार्ये केल्यावर गुरूची आज्ञा घेऊन व आपोशनादि किया पूर्वी करून मौन धरून जेवावें; अन्नाचा आदर करावा, त्यास दोष देऊं नये. ३१ ब्रह्मचर्याश्रमांत असणाऱ्यानें, रोगादिक आपत्तीचें कारण नसल्यास, एकाचेच घरचें अन्न खाऊं नये; ब्रह्मचारी ब्राह्मणानें श्राद्धभोजन इच्छेस येईल तर करावें, पण त्या आश्रमास उक्त व्रताचा भंग करूं नये. ३२ मद्य, मांस, डोळ्यांत अंजन (सुरमा वगैरे ) घालणे, [ अन्य पुरुषाचें ] उच्छिष्ट, निष्ठुर भाषण, स्त्री, जीवाचा वध, [ उदयाचे किंवा अस्ताचे समयीं] सूर्यदर्शन, असत्य बोलणें, लोकांचे दोष काढर्णे, व गंधमाल्यादि जे भोगसाधनपदार्थ, हीं संर्व | ब्रह्मचार्याश्र- म्यानें ] वर्ज करावीं. ३२ जो कोणी [ गर्भाधानादि उपनयनान्त ] संस्कार करून (शिष्यास) वेद पढवितो तो गुरु होय; जो केवळ उपनयनविधि करून [ शिष्यास ] वेद शिकवितो त्यास आचार्य असें ह्मटलेले आहे. ३४ वेदाचा एकादा विभाग [ शिष्यास जो शिकवितो तो ] उपाध्याय, यज्ञयागादिक- मात्र कर्म जो करितो तो ऋत्विज ( पहिला सर्वांत विशेष, दुसरा त्याहून कमी याप्रमाणे ) अनुक्रमानें ( गुरूपासून ) हे पूज्य आहेत. पण या सर्वांहून माता विशेष पूज्य. ३५ प्रत्येक वेदाचे [ अध्ययनाचे ] संबंधानें शिष्यानें ब्रह्मचर्यव्रतानें बारा बारा किंवा पांच पांच वर्षे पावेतों राहावें; कांहीं ऋषींचे मतें वेदाध्ययन पुरे होईपावेतों ब्रह्मचर्य- व्रतानें रहावें. सोळाव्या वर्षी केशवपन [ गोदान चा संस्कार ] करावें. ३६ ब्राह्मण, क्षत्रिय, व वैश्य यांच्या उपनयनाच्या काळाची अत्यंत सीमा [ अनुक्र- मानें ] सोळा, बावीस, आणि चोवीस वर्षांपावेतों आहे. [ या काळांत उपनयनविधि न झाल्यास ] यापुढे हे [ तीनही वर्णीतील मुलगे ] कोणत्याही धर्मास अधिकारी होत नाहींत. ज्यांस गायत्रीमंत्र मिळाला नाहीं ते जर उपनयनकालातिक्रमाबद्दल प्रायश्चित्तार्थ ' व्रात्यस्तोम' नांवाचा यज्ञ न करतील तर त्यांस 'व्रात्य ' [ सर्वसंस्काररहित ] असें ह्मणतात. ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य यांचें प्रथम जन्म मातेपासून [ होतें ]; दुसरें जन्म मौंजीबंधनापासून [ होतें ]; ह्मणून त्यांस द्विज [ दोन वेळ जन्मलेले ] असें ह्मणतात. ३९ यज्ञयागादि सर्व क्रिया, तपश्चर्या, आणि सर्व प्रकारचीं शुभ कर्मों [ हीं सर्व वेदापा- सूनच प्राप्त झालेली आहेत ह्मणून ] ब्राह्मण, क्षत्रिय, व वैश्य या द्विजातींस वेद हेंच मोक्षप्राप्तीचें उत्कृष्ट साधन आहे.