पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ याज्ञवल्क्यस्मृति, वटीं गायत्रीमंत्राचें शिर- आपोज्योतिरसोमृतं इत्यादिक मंत्र ह्मणावा. या ७ व्याहृति व गायत्रीमंत्र व आपोज्योति हें शिर, या नवांत प्रत्येकाच्यापूर्वी ॐ हा प्रणव जोडावा. याप्रमाणे तीन वेळ गायत्रीमंत्राचा जप केला ह्मणजे एक प्राणसंयम ( प्राणा- याम ) [ झाला ]. २३ सायंसंध्येच्या वेळीं [ वर सांगितल्याप्रमाणे ] प्राणायाम करून ( आपोहिष्ठा इत्या- दिक तीस मंत्र जलदेवतांस अनुलक्षून आहेत त्या ) मंत्रांनी अंगावर मार्जन करून तोंड पश्चिमेस करून नक्षत्रें दिसूं लागत तोंपावेतों गायत्रीमंत्राचा जप करीत बसावें.

  • २४

प्रातःसंध्येच्या वेळी याच रीतीनें [ प्राणायामादिक वर सांगितल्याप्रमाणे करून ] पूर्वेस तोंड करून सूर्योदय होईपावेतों उभं रहावें. प्रातःकाळी व सायंकाळी संध्या झाल्यानंतर अग्निकार्य [ ब्रह्मचाऱ्यानें करण्याचा होय ] करावें: [ +२५ अग्निकार्यानंतर मी अमुक शर्मा आहे, असें ह्मणून वडील माणसांस वंदन करावें; नंतर अंतःकरणवृति स्थिर करून गुरूपासून वेदाध्ययन करून घेण्यासाठी गुरूची सेवा करावी. २६ ( गुरूनें ) अध्ययन करण्यास बोलाविलें तरच अध्ययन करावें (अध्ययन सांगा असे शिष्यानें गुरूस ह्मणूं नये ). जें काय त्यास [ भिक्षा मागून वगैरे ] मिळेल तें त्यानें गुरूस अर्पित करावें व मन, वाणी, आणि शरीर यांच्या व्यापारांनी गुरुचें हित जितकें होईल तितकें नित्य करीत जावें. २७ केलेले उपकार जाणणारे, इतरांशीं न भांडणारे, धारणावती बुद्धि ज्यांस आहे असे, पवित्र, शरिरानें आणि अंतःकरणाचे सुदृढ, लोकांचे दोष न काढतां केवळ गुण घेणारे, साधु ( चांगलें वर्तन करणारे ), आप्त, [ गुरुसेवेविषयीं शक्तिमान् ] आणि ज्ञान व द्रव्य देणारे असे [ शिष्य ] असतील तर त्यांस पढविलेंच पाहिजे अशी धर्मशास्त्राची आज्ञा आहे. २८ दंडकाष्ठ, चर्म [ काळविटाचें ] कातडें, यज्ञोपवीत, आणि मौंजादि तृणांची कटिरज्जू हीं धारण करावीत; आणि उदरनिर्वाहासाठी अनिंद्य ब्राह्मणांचे घरीं भिक्षा मागावी. २९ ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य यांनी भिक्षा मागतांना ' भवान् ' किंवा 'भवती ' हा शब्द अनुक्रमानें आरंभी, मध्ये, आणि शेवटीं योजावा, [ ह्मणजे ब्राह्मणानें ] 'भवति

  • सूर्याचें अर्ध बिंब वर दिसतें आहे अशा वेळेस त्यास अर्ध्य पोंचतील अशा बेतानें सायंसंध्येस

आरंभ करावा. + प्रातःसंध्येचा आरंभ करणें तो किंचित् किंचित् नक्षत्रे दिसत आहेत तोंच करावा. याबद्दल दुसऱ्या स्मृतींत प्रमाणे आहेत.