पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. उपनयनविधि. गर्भधारणापासून किंवा जन्मापासून आठव्या वर्षी ब्राह्मणाचा ( ९ ) उपनयनविधि [ मौजीबंधन ], क्षत्रियांचा अकरावे वर्षी, व वैश्यांचा बारावे वर्षी. कांही ऋषींच्या मतें कुलांत [ ज्या काली करण्याची ] चाल असेल त्या काली करावा.. १४ गुरूनें शिष्याचें प्रथम मौंजीबंधन करून मग भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्यम्, या ७ महाव्याहृति आरंभी पढवून नंतर त्यास वेद पढवावा आणि शौचाचार ( शरिरास पवित्र व निर्मल ठेवण्याचे विधि ) त्यास शिकवावे. ब्रह्मचारिमकरण. सूर्योदयाची संधि व सूर्यास्ताची संधि व यांच्यामधील सर्व दिवस यज्ञोपवीत [ उजव्या ] कानावर ठेवून उत्तरेकडे तोंड करून [ बसून ] मलमूत्रत्याग करावा. ह्रीं दोन्ही कर्मे रात्रीं [ करणें झाल्यास ] दक्षिणेकडे तोंड करून करावी. [ एका हातीं ] शिश्न घरून उठावें, आणि मातीनें आणि वर पाणी ओतून दुर्गंधाचा झालेला लेप दूर करणारा निर्मलतेचा विधि आळस न करतां करावा. सर्वदा शुद्ध ठिकाणी उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून गुडघ्यांचे आंत हात करून द्विजानें बसावें आणि ब्राह्मतीर्थानें (आंगठ्याच्या मुळानें ) आचमन करावें. [ शेवटचे ] करांगुलीचे (कनिष्ठि केचे) मूळ भागाचें नांव 'प्रजापतितीर्थ'; प्रदेशिनीचे ( आंगठ्याजवळचे बोटाचे, तर्जनीचे ) मूळ भागाचें नांव ' पितृतीर्थ; ' आंगठ्याचे मूळ भागाचें नांव ‘ ब्राह्मतीर्थ' आणि हाताचें अग्र ( सर्व बोटांची अग्रे ) यांस 'देवतीर्थ' अशा क्रमेंकरून संज्ञा जाणाव्या. . तीन वेळ आचमन करावें. अंगुष्ठमूलानें दोन वेळ दोहों ओठांस स्पर्श करावा. [ नाक, कान, डोळे या तीन ] इंद्रियछिद्रांस पाण्याचा स्पर्श करावा. पाण्यांत फेंस, बुडबुडे नसून ते स्वाभाविक स्वच्छ स्थितीत असावें. २० द्विजाति [ब्राह्मण, क्षत्रिय, व वैश्य] हे अनुक्रमानें त्यांचे हृदयास, घशास, व टाळूस तीन वेळ आचमनाच्या पाण्याचा स्पर्श झाल्याने पवित्र होतात. स्त्री आणि शूद्र हे त्यांचे टाळूस एक वेळ स्पर्श झाल्याने पवित्र होतात. २१ स्नान, जलदेवतांस उद्देशून [जे आपोहिष्ठादि मंत्र आहेत त्या] मंत्रांनी मार्जन करणे, प्राणाचा [ प्राणसंज्ञक वायूचा ] निरोध करणे ( ज्या कृत्यास प्राणायामक्रिया लौकिकांत ह्मणतात ती ), सूर्याचें उपस्थान, आणि गायत्रीमंत्राचा जप, हीं [ कर्मों ] प्रतिदिवशी [ करावीं ]. २२ ( ॐ भूः इत्यादिक सात ) व्याहृति प्रथम उच्चारून, गायत्रमिंत्र ह्मणून त्याचे शे-