पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विवाहाविषयीं. प्रकरण दुसरें. विवाहाविषयीं. ( २२. ) मनुष्यास कोणत्याही वस्तूवर सत्ता ह्मणजे मालकी प्राप्त होणें, तो पांच प्रकारांनी होत असते, असे व्यवहारमयूखकार ह्मणतो, ' त्याविषयी पुढे दायविभागांत वि- चार होईल. प्रस्तुत व्यवहार हा मुख्य गृहस्थाश्रमाच्या संबंधानें पहावयाचा आहे, आणि गृहस्थपणाचा मूळ पाया विवाह, ह्मणून त्याचा प्रथम विचार करितों. ( २३. ) शास्त्रांमध्ये आठ प्रकारचे विवाह सांगितलेले आहेत, परंतु सांप्रत सर्वांचे विवाह, नांवाला तरी, ब्राह्मविधीनें होत असतात. नांवाला ह्मणण्याचे कारण प्र० २ . . २६ १. व्यवहारमयूख, दायभाग, पृ० ८३ “ स्वामीरिक्थक्रयसंविभागपरिप्रहाधिगमेषुब्राह्मणस्याधिकं- लब्धं क्षयस्यविजितंनिर्दिष्टंवरैयशूद्रयोरिति " अर्थः - १ रिक्थ, २ क्रय, ३ संविभाग, ४ परिग्रह, ५ अधिगम, इतक्या निमित्तांनी मालकी प्राप्त होते. शिवाय ब्राह्मणास प्रतिग्रहाने मिळेल तें अधिक; क्षत्रियास विजयप्राप्त; वैश्यास उदीमानें मिळेल तें; व शूद्रास ( द्विजांच्या ) सेवेने मिळेल ते अधिक प्रकारचें द्रव्य होय. आतां हे सत्तेचे पांच प्रकार गौतमाने वार्णले ते लोकसिद्ध सत्तेचेच अनुवाद आहेत; असे प्रथकारांनी ठरविले आहे. आमचा इंग्लिश ग्रंथ पान ३१ ). ४ .२. १ बाह्म, २ देव, ३ आर्ष, ४ माज्यापत्य, ५ आसुर, ६ गान्धर्व, ७ राक्षस, ८ पैशाच. १ घराला बोलावून सामर्थ्याप्रमाणे कन्येला अलंकृत करून देणे, हा ब्राह्मविवाद; २ यज्ञाच्या ठायीं व.र्म करणाऱ्या ऋत्विजास कन्या देणे, द्दा दैवविवाह; ३ वराकडून एक गाय व एक बैल घेऊन कन्या देणे, द्दा आर्षविवाह; ४ तुझी उभयतांमिळून धर्माचरण करा असे सांगून कन्या देणे, हा प्राजापत्यविवाह; ५ द्रव्य घेऊन कन्या दर्णे हा आसुरविवाह; ६ परस्परांच्या संकेतानें जो होतो, तो गान्धर्व विवाह; ७ युद्ध करून हरण करून कन्या आणणे, हा राक्षसदिवाह; ८ कपटानें कन्या पळवून नेऊन विवाह करणें, तो पैशाचविवाह. आसुर विवाहास मानुषविवाह अर्सेही नांव आहे; ( मदनपा- रिजात विवाहप्रकरणः- “तथाच हारीतः शौल्केन मानुषइति. " अर्थ:- कन्येचें मूल्य घेऊन जो विवाह, तो मानुष होय ). राक्षस विवाहास, क्षात्र विवाह असे दुसरे नांव आहे. ( मदनपारिजात विवाह- प्रकरण पहा.) ३. कन्यादानकालीं मी ब्रामविवाहविधीनें कन्येचें दान करितों असा संकल्प करितात. ( नारा- यणभट्टकृत प्रयोगरत्न, मुंबई येथे छापिलेकी आवृत्ति, शके १७८१ पत्र ७४.) हा ब्राह्मणाविषयी आहे. व्यवहारमयूख, दायविभाग, सत्ताप्रकरण ( संस्कृत प्रत पृ. ८८, मराठी भाषान्तर, आवृत्ति दुसरी पृ. ७ पहा. ) यांत क्षत्रियास ब्राह्मादि विवाह सर्वोच्या मतें निर्विवादच आहेत अर्से घटलेले आहे. मराठीत क्षत्रियादि लिहिले ती चुकी आहे ). आतां, वैश्य व शूद्र यांस शास्त्रतः ब्राह्मविवाह करण्यास सांगितलेलें नाहीं; तथापि त्यांच्या दायसंबंधी नियमांत सांप्रत विशेष फेरफार नाहीं, ह्मणून त्यांच्या संततीच्या दायाचा विचार ब्राह्मविवाइजन्य संततीप्रमाणेच मोजिला जातो. शूद्रकमलाकर ग्रंथीं विवादप्रकरणीं कोणाच्या मतें शूद्रासही ब्राह्मविवाहाचा अधिकार आहे, असे लिहिलेले आहे, व संवर्तस्मृतीत सर्व द्वि- जांना ब्राह्मावीधमात्र सांगितलेला आहे व इतर सर्व प्रकार निषिद्ध केल्यासारखे भासतात. ( पहा, दं