पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ जेथें मुलींचे पैसे घेतातं, ते विवाह ब्राह्म नव्हत; परंतु सांप्रत शास्त्राहून रूढि बलवत्तर झाली आहे, व कायद्यानेंही धर्मशास्त्रापेक्षां देशरिवाजाचें मान अधिक ठेविलें आहे, यामुळे जो रूढ ब्राह्मविवाह हल्लीं होतो, तोच शास्त्रतः हि ब्राझविवाह मानिला आहे. मि. मेन आपल्या ग्रंथांत हल्ली ब्राह्म व आसुर असे दोन प्रकार मात्र अवशिष्ट राहिले आहेत व इतर सर्व लुप्त झाले असे ह्मणतो ( पारिग्राफ ८० आवृत्ति ५ पहा ). परंतु निरनिराळ्या ठिकाणांची व जातींची असावी तितकी माहिती संगृहीत होईपर्यंत अशा प्रकारचा कोणताही सिद्धान्त करणे धोक्याचे दिसतें. स्त्रीधनाधिकारी ठरविण्यांत मात्र कोर्टाला या विवाहभेदांचा उपयोग दिसतो.. तशा प्रसंगी अमुकच विवाह चालू आहेत व अमुक लुप्त झाले असे काहीएक गृहीत धरून न चालतां कोर्टानें विवाह शास्त्रसंमत- विधीनें झाला आहे असे प्रथम दर्शनीं अनुमान करून तो तसा झाला नाहीं हें शाबीत करण्याचा बोजा तशी तकरार करणारावर ठेवावा, व देशरिवाज किंवा जातीचा आचार पाहतां अप्रशस्त जे चार प्रकार सांगितले आहेत त्यांपैकी एकादा चालू आहे असे दिसून •आल्यास दायनिर्णय तदनुसार करावा हे मला बरे दिसतें. मद्रास इलाख्यांत ब्राह्मणांत आसुर विवाह हायकोर्टानें सशास्त्र धरला आहे." योग्य विधीनें, केल्यास गांधर्व विवाहहि सशास्त्र होऊ शकेल असेंहि त्याच कोर्टानें ठरविले आहे... नगर विसावाणी जातींत वधूस पल्ला देण्याची चाल आहे. तितक्यावरून मुलगी द्रव्यनिष्क्रयानें विकत घेतली असे होत नाहीं ह्मणून असा विवाह आसुर विवाह न मानतां प्रशस्त विवाहांपैकी मानला पाहिजे, व वैश्य, व शूद्र यांस स्मृतिग्रंथांत आसुर विवाह सांगितला आहे त्याचा अर्थ तेवढाच विवाह त्यांला आहे असा नसून तो विवाह त्यांनी केल्यास हरकत नाहीं इत- काच आहे.---( जयकिसनदास गोपाळदास वि० हरकिसनदास हलोचनदास ई० ला० रि० मुं० व्हा० २ पा० ९.). भंडारी व अशाच खालच्या कांहीं जातींत आसुर विवाह ^करण्याची चाल आहे. नवप्यानें मुलीच्या बापाला 'देज' ह्मणून कांहीं द्रव्य देऊन जो विवाह करितात त्यास सांप्रत आसुर विवाह ह्मणतात. या चालीमुळे स्त्रीधनाच्या वारशांत कांही विशेष नियम लागतो तो स्त्रीधन सदराखाली पहावा. ( विजयरंगम वि० लक्ष्मण मुं० हा० रि० व्हा० ८ पा० २४४. ) गांधर्व विवाह पूर्व युगी असेल तरी हल्लीं तो चालू नाहीं सबब गांधर्व विवाहानें आपले लग्न झाले आहे असे ह्मणणारी स्त्री राखेसमान मानावी, व अशा स्त्रियांची संतति वारशास अधिकारी होते अशी चाल आहे ह्मणून तकरार निघेल तर साधारण धर्मशास्त्राच्या विरुद्ध ही चाल आहे, या सब- - . ४. सन १८२७ चा का० ४ क० २६ पहा. ५. विश्वनाथ वि० स्वामिनाथ इं० ला० रि० १३ म० ८३. ६. वृंदावन वि० राधामणी इं० ला० रि० १२ म० ७२.