पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. पुरुषाला उपायानें (शास्त्रांत सांगितलेले मार्गानें ) द्रव्य ( गाई इत्यादि जे दानास योग्य पदार्थ ) देणें हें सर्व धर्म-(पुण्य ) प्राप्तीचें कारण होय. ६ १ वेद, २ स्मृति, ३ सदाचार ( शिष्टांची परंपरागत चाललेली वाहेवाट ), ४ आ- पल्या आत्म्यास जे आवडतें तें (ह्मणजे समान योग्यतेच्या २ पक्षांपैकी कोणताही एक ), आणि १ सुसंकल्पापासून उत्पन्न झालेली इच्छा हीं पांच धर्माची मूलभूतें ह्मणजे प्रमाणें ( धर्म ह्मणजे काय हे ज्ञान होण्याची कारणे ) सांगितली आहेत. ( यज्ञयागादि क्रिया करणें, [ शास्त्रोक्त ] सदाचाराने चालणें, सर्व भोगेच्छांचा त्याग [ किंवा त्यांचें संयमन ] करणे, हिंसा ( जीवाचा वध ) न करणे, दान करणे, आणि वेदांचा अभ्यास करणें, या सर्व कर्मात योगाभ्यासानें आत्मस्वरूपाचें ज्ञान करून घेणे हाच श्रेष्ठ धर्म होय. ८ वेदांत सांगितलेले धर्म नाणणारे चार ब्राह्मण किंवा तीन तीन वेद जाणणाऱ्या [ एकाहून जास्त ] ब्राह्मणांच्या समूहास 'पर्षद्' असें ह्मणतात. ती पर्षद् [ सभा ] जें बोलेल तो धर्म [ समजावा ], किंवा अध्यात्मज्ञानी ( आत्मज्ञानी ) पुरुषांत जो अत्यंत श्रेष्ठ तो एकटाही जे बोलतो तो धर्म [ समजावा ]. संस्कार. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, [ आणि ] शुद्र हे जे [ चार ] यांस 'वर्ण ', असें ह्मणतात. पहिल्या तिहींस ‘द्विज' असं ह्मणतात; गर्भाधान संस्कारापासून स्मशानांतील [ उत्तर ] क्रियांपावेतों द्विजांची सर्व कर्मे [ वेदोक्त] मंत्रांनींच [ होतात. ] १० स्त्रीचे [ प्रथम ] ऋतुकालांत (१) गर्भाधानविधि, [ गर्भास जीव प्राप्त होऊन त्याचें ] चलन वलन होऊं लागण्याचे पूर्वी ( २ ) पुंसवनविधि ( पुत्रोत्पत्त्यर्थविधि), सहाव्या किंवा आठव्या महिन्यांत ( ३ ) सीमंतोन्नयनविधि, [ प्रसूति होतांच ] ( ४ ) जातकर्म (पुत्रावण ) विधि असे होतात. ११ [ प्रसूतीचे ] अकरावे दिवशीं ( ५ ) नामकरणविधि, चौथे महिन्यांत ( ६ ) निष्क्रमविधि [ ह्मणजे मुलास बाहेर काढून सूर्य दाखविणें ], सहावे महिन्यांत अन्नप्राश- नविधि [ ह्मणजे उष्टावण ], [ त्यानंतर ] कुळांत चाल असेल त्याप्रमाणें ( ८ ) चूडा- कर्मविधि [ ह्मणजे चौल ] हे करावे. १२ याप्रमाणें [ संस्कार केले ह्मणजे ] बीज [ पुरुषवीर्य ] संबंधाचें आणि गर्भ [ स्त्री- वीर्य ] संबंधाचें पाप जाते. कन्या जन्मल्या असतां हेच संस्कार मंत्र न उच्चारतां मुका- ट्यानें करावे, पण स्त्रीचा विवाह समंत्रकच [ मंत्र ह्मणून] करावा. १३