पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र, भाग २ रा. याज्ञवल्क्यस्मृति. आचाराध्याय. उपोद्घात. योगिपुरुषांत श्रेष्ठ जो याज्ञवल्क्य [ मुनि ] त्याची पूजा करून ऋषि बोलले [ कीं ], वर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शूद्र), आश्रम (ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ, आणि संन्यास), आणि इतर (ह्मगने अनुलोम, प्रतिलोमांदि मिश्रजाति), यांचे एकंदर सर्व धर्म [ कर्तव्यें ] आह्मांस सांग. १ मिथिला देशांत रहाणारा [व] योगिपुरुषांत अग्रगण्य ( याज्ञवल्क्य ), क्षणमात्र विचार करून, ऋषींस ह्मणाला ( उत्तर दिलें कीं ), ज्या देशांत काळ्या रंगाचा काळवीट ( हरिण जातीचा नर ) स्वच्छंदानें विहार करतो त्या देशांतच करण्यास योग्य ( अन्य देशांत करण्यास अयोग्य ) जे धर्म ते सांगतों, ऐका. २ १ पुराणे, २ न्याय, ३ मीमांसा, ४ धर्मशास्त्रे, [ आणि ] [ ६ ] अंगें [ १ शिक्षा, २ कल्प, ३ व्याकरण, ४ निरुक्त, ५ छंद, ६ ज्योतिष ], यांहीं युक्त ऋक्, यजुस, साम, अथर्व ४ वेद, असे हे १४ मूल ग्रंथ, विद्या [ पुरुषार्थप्राप्तीला जी कारणीभूत ज्ञानें ] आणि धर्म यांचीं स्थानें [ मुळें ] होत. ३ १ मनु, २ अत्रि, ३ विष्णु, ४ हारीत, ५ याज्ञवल्क्य, ६ उशनस्, ७ अंगिरस्, ८ यम, ९ आपस्तंब, १० संदी, ११ कात्यायन, १२ बृहस्पति, १३ पराशर, १४ व्यास, १५ शंख, १६ लिखित, १७ दक्ष, १८ गौतम, १९ शातातप, आणि २० वसिष्ठ, हे [ वीस ऋषि ] धर्मशास्त्राचे प्रयोजक ( प्रसिद्ध करणारे ) होत. स्वधर्मावर विश्वास ठेवून [ योग्य ] देशीं [ योग्य ] कालीं दान घेण्यास योग्य