पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संस्कृत आवृत्तीचा उपाध्दात. ४ जीमूतवाहनकृत दायभाग कलकत्त्यास एज्युकेशन छापखान्यांत खिळेछापावर छापलेला. इ० सन १८२९. ५ जैमिनिकृत पूर्व मीमांसा - कलकत्त्यास गणेश छापखान्यांत खिळे छापावर छापलेली. इ० सन १८७३. तर्कसंग्रहदीपिका-मुंबईत निर्णयसागर छापखान्यांत खिळे छापावर छापलेली. इ० सन १८७६. ७ दत्तकचंद्रिका–कलकत्त्यास एज्युकेशन छापखान्यांत खिळे छापावर छापलेली. इ० सन १८३४. दत्तकमीमांसा-वरप्रमाणें. ८ ९ धर्माब्धिसार मुंबईत बापु सदाशिव शेट यांणी शिला छापावर छापलेला. शके १७८३. १० निर्णयसिंधु-त्याच ठिकाणी शके १७८४. ११ पाणिनि-बोण नगरांत बोधलिंग याणें छापविला. खिळे छापावर छापलेला. इ० सन १८३९. १२ मनुस्मृति-मुंबईत बापु सदाशिव शेट यांणीं शिला छापावर छापलेली. शके १७८०. १३ मिताक्षरा-मुंबई येथे प्रज्ञायुक्त ज्ञानसागर छापखान्यांत शिळा छापावर छापलेली. शके १७८५. १४ वीरमित्रोदय-खिदिरपुरांत मदनपाल यांचे छापखान्यांत खिळे छापावर छापलेला इ० सन १८१५. १५ संस्कार कौस्तुभ - मुंबईत बापु सदाशिव शेट यांणी शिळा छापावर छापलेला. शके १७८३. याप्रमाणे मी यथामति विचार करून जनांस सुख व्हावें एतदर्थ जो थोडा उद्योग केला आहे तो बुध जनांनी पाहून त्यांणी त्यांतील गुणदोष निवडावे हें त्यांजपाशीं माझें मागणे आहे. त्या उद्योगानें लोकरक्षणकर्ता परमात्मा ईश्वर प्रसन्न होवो. मुंबई, शके १८०१ विश्वनाथ नारायण मण्डलीक.