पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संस्कृत आवृत्तीचा उपोन्दात. ( ग ) रामदीक्षित आपटे यांचे संग्रहांतील एक पुस्तक रा० रा० नारायणराव कानिटकर यांनी मिळवून पुण्याहून पाठविलेला. ( घ) रा० रा० वासुदेव हरी आठल्ये यांनी रत्नागिरीहून पाठविलेला. ( ङ ) शके १७८५ वर्षी मुंबई शहरी शिलाछापावर छापलेले पुस्तक. ( क ) सन इसवी १८२६ वे वर्षी मुंबई सरकारचे हुकुमानें प्राचीन पोथ्यांचे आकाराचें टैपावर छापलेले पुस्तक. ( छ ) डाक्टर भाऊ दाजी यांजपासून आह्मीं विकत घेतलेलें. ( ज ) श्रीकाशीतील पुस्तकाची प्रत लेखकाकडून करवून आणविलेली. वरील पुस्तकांपैकी क, ग, घ, हीं पुस्तकें मूळ एकाच पुस्तकाच्या प्रती असाव्या असें दिसतें. (ख) हे पुस्तक दुसऱ्या पुस्तकाची प्रत पाहून लिहिलेले आहे. हे पुस्तक पाऊणशे वर्षांहूनही जुनें आहे असे भासतें. रा० रा० रामदीक्षित आपटे यांनी स्वतःचें पुस्तक पाठविलें तें शंभर वर्षांपलीकडील काळचे आहे. परंतु हे पुस्तक शुद्ध दिसले नाहीं ह्मणून त्याचा उपयोग झाला नाहीं. सुरतेहूनही एक पुस्तक आणविलें होतें. तेही प्रायः शुद्ध नाहीं ह्मणून त्याचाही आधार घेतला नाहीं. या ग्रंथांत ग्रंथनामांचे ठिकाणी संक्षिप्त सांकेतिक चिन्हें लिहिली आहेत तीं येणेप्रमाणें:- ( १ ) अ० = अध्याय. ( २ ) अ० को ० = अमरकोश. (३) आ० = आचाराध्याय. ( ४ ) क० == = कण्डिका. ( ५ ) क० वि० = कमलाकरकृत विवादताण्डव. ( ६ ) का ० = काण्ड. ( ७ ) जी० दा० = = जीमूतवाहनकृत दायभाग, (८) प० = पत्र. ( ९ ) परि ० = परिच्छेद. 。= ( १०) पा० = पाद. ( ११ ) पू० = पूर्वार्ध. ( १२ ) पृ० = पृष्ठ. ( १३ ) प्रा० = प्रायश्चित्ताध्याय, ( १४ ) म ० = मनु.