पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संस्कृत आवृत्तीचा उपोध्दात. भट्ट यानें व्रतार्क आदिकरून (ज्यांस उत्तरपद 'अर्क' हे आहे असे ) उत्तम बारा ग्रंथ रचिलेले आहेत. रामकृष्णभट्टास दिनकरभट्ट, कमलाकरभट्ट, आणि लक्ष्मणभट्ट असे तीन पुत्र होते. त्यांपैकीं दिनकरभट्टानें उद्योतशांतिसार आदिकरून रचलल ग्रंथ प्रसिद्ध आहेत. दिनकरभट्टासच कांहीं ग्रंथांत दिवाकरभट्ट असेंही झटलेले आहे. दिनकर- भट्टाचा पुत्र विश्वेश्वरभट्ट यासच गागाभट्ट असेंही दुसरें नांव आहे. भट्टचिंतामणि आदि- करून त्यानें अनेक ग्रंथ केले आहेत. कमलाकरभट्टानें केलेले ग्रंथांत निर्णयसिंधु वगैरे अंथ फार प्रसिद्ध व मोठे मान्य आहेत. कमलाकरभट्ट कोणत्या काळी झाला याचा नि- र्णय निर्णयसिंधु ग्रंथाचे शेवटचे श्लोकावरून होत आहे: तो श्लोक असाः -- 'वसु ( ८), ऋतु ( ६ ), ऋतु ( ६ ), भू ( १ ); (ह्मणजे १६६८) वर्षे विक्रम राजापासून होऊन गेली असतां रौद्रनामक संवत्सरी माघमासी तृतीया तिथीस श्रीधरपति- चरणकमली हा ग्रंथ आर्पला. ' कमलाकरभट्टाचा पुत्र अनंतभट्ट यानें श्रीरामकल्पद्रुम आदिकरून बहुत पद्धति- ग्रंथ ( लहान लहान प्रयोगग्रंथ ) केले आहेत. लक्ष्मणभट्टानेंही आचाररत्न आदि- करून केलेले ग्रंथ प्रसिद्ध आहेत. याचप्रमाणे या कुळांत पुढेही महान् विद्वान् तपस्वी झाले. त्यांचीही कार्ति दिगंतरीं पोंचलेली आहे. या सर्वांची नामें समजण्यासाठी वंशवृक्ष खालीं दिला आहे. त्यांपैकी जे पुरुष हल्ली विद्यमान आहेत त्यांचे नांवास श्री हे पद जोडिलें आहे. "" वंशवृक्ष संस्कृतमूळाचे उपोद्धाचे ६ वे पृष्ठावर पहावा. त्याचप्रमाणे येथें जोडावयाचा. पूर्वी इसवी सन १८२६ वे वर्षी मुंबई सरकारचे हुकुमानें या मुंबई शहरांत व्यवहारमयूखाचें पुस्तक छापलें गेलें. हा ग्रंथ छापल्यावर दुसऱ्या वर्षी बारोडेल या नांवाचे एका इंग्लिश विद्वानानें सर्व लोकांचे माहितीसाठी या ग्रंथाचें इंग्रजी भाषांतर छापून प्रसिद्ध केले. त्याच ग्रंथाच्या भावार्थाचें विशेष स्पष्टीकरण करावें या हेतूनें प्रसिद्ध प्रसिद्ध क्षेत्रांतील विद्वज्जनांचें संग्रहांतील पुस्तकें मिळवून खरा पाठ कोणता हें प्रथम ठरवून हा ग्रंथ छापण्यांत आला आहे. मिळविलेल्या ग्रंथांपैकी काहीबद्दल तपशील:- ( क ) रा० रा० भिकदेव वासुदेव आठल्ये यांचे मार्फत मिरजेहून मिळविलेला. ( ख ) गजेंद्रगडकर प्रसिद्ध आचार्य यांचे संग्रहांतील एक पुस्तक रा० रा० गोविंद विनायक खांबेटे यांनीं मागून घेऊन सातायाहून पाठविलेला.