पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संस्कृत आवृत्तीचा उपाध्दात. ऊन गेला. त्याचा पुत्र रामकृष्णभट्ट श्रीराम दैवताच्या आराधनेंत निमग्न असे. ' गोविंदभट्ट व रामेश्वरभट्ट यांनी कोणकोणते ग्रंथ केले व त्यांचे काळ याचा खात्रीलायक शोध आतां लागत नाहीं. नारायणभट्ट कधीं होऊन गेला ती वेळ त्यानें स्वहस्तानें लिहिलेले पुस्तकांवरून आणि त्यांवरील शकावरून समजते. त्यां तील एका पुस्तकावर विक्रमार्क संवत्, १६२४ असे अंक लिहिलेले आहेत. दुसऱ्या एका पुस्तकावर खाली लिहिलेले दोन श्लोक लिहिलेले आहेत त्यांवरून ( १४५७ ) असे अंक उपलब्ध होतात. ( १ ) ऋषि ( ७ ), बाण ( ५ ), समुद्र ( ४ ), पृथ्वी ( १ ) या अंकांचे शकांत ज्येष्ठ महिन्याचे शुद्धपक्षी आदित्यवारी चतुर्दशी तिथीस विशाखा नक्षत्रीं हा ग्रंथ समाप्तीस पोंचला. (२) शबरानें रचलेले भाष्याचा सातवा अध्याय भट्टरामेश्वराचे पुत्रानें काशक्षित्रांत यथामीत लिहिला. त्याच पुस्तकाच्या बाराव्या अध्यायाचे शेवटचे पृष्ठावर संवत् १६१२ असे अंक लिहिलेले आहेत. सर्व शास्त्रांत प्रवीण व महान् महान् ग्रंथ रचणारे रामकृष्णभट्ट व शंकरभट्ट असे दोन पुत्र नारायणभट्टास होते. रामकृष्णभट्ट यानें केलेले ग्रंथांत महान् ग्रंथ ह्मटला ह्मणजे तंत्रवार्तिक व्याख्या हा होय. धर्मशास्त्रावर तर जीव- पितृकनिर्णय आदिकरून त्याचे अनेक ग्रंथ आहेत. शंकरभट्टानें रचिलेले ग्रंथांत द्वैतनिर्णय ह्मणून जो महान् ग्रंथ आहे तो फार प्रसिद्ध आहे. मीमांसा शास्त्रावरही त्यानें रचिलेली कांहीं प्रकरणें सांप्रत उपलब्ध आहेत. या ह्मणण्यास आधार 'द्वैत- निर्णय ' ग्रंथाचे आरंभी दोन श्लोक आहेत तो होय. त्यांचा अर्थ असाः- ‘( १ ) मीमांसाशास्त्र रूप सरोवरांतील कमलाच्या मकरंद्राचें आस्वादन करणें हेंच ज्याचें एक व्रत, हंसस्वरूप, स्वकीय यशानें शुद्ध झालेले अद्वैत मताचें ज्ञान झाल्यानें ज्याला गुरु ही संज्ञा प्राप्त झाली, वाग्देवीशी जिचें मात्सर्य नाहींसें झालें अशा लक्ष्मीशी नित्य अनुरक्त होत्साता, सेवा करणारा, काशीवास न सोडणारा, या नांवाचा श्रीनारायण- भट्ट सर्वोत्कर्षानें राहतो. ( २ ) विद्वज्जनांचे आनंदास वृद्धि करणारा मीमांसा व अद्वैतज्ञान यांत परिपूर्ण श्रेष्ठत्व पावलेला, आणि नीतिशास्त्रज्ञ असा श्रीनारायणभट्टाचा पुत्र भट्टशंकर झाला. ' शंकरभट्टास दोन पुत्र, नीलकंठ भट्ट व दामोदरभट्ट दानमयूख आदिकरून जे बारा मयूख ग्रंथ आहेत ते नीलकंठभट्टानें रचिलेले आहेत. द्वैतनिर्णय नामक ग्रंथाचें दत्ताप्रदानिक ह्मणून जें प्रकरण आहे त्यांतील उल्लेखांवरून दामोदरभट्टानें द्वैतनिर्णयपरिशिष्ठ ग्रंथ केला आहे असे समजतें. नीलकंठभट्टाचा पुत्र शंकर