पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संस्कृत आवृत्तीचा उपोध्दात.. बाळशास्त्री रानडे यांनी त्या पुरुषाच्या वंशासंबंधी लिहून ठेवलेल्या हकीकर्तीचे अनुरोधानें खाली लिहिलेला थोडा इतिहास दिला आहे. " दक्षिण देशांत पैठण गांवीं मोठा तपस्वी, विद्वान्, व सर्व ब्राह्मणांत श्रेष्ठ असा गोविंदभट्ट नांवाचा पुरुष होऊन गेला. रामेश्वरभट्ट नांवाचा त्याचा पुत्र काशीक्षेत्री रहावें या हेतूने त्या क्षेत्री जाऊन राहिला व त्यानें श्रीराममंत्रानें भगवंत रामचंद्र दे- बतेची आराधना चिरकाळपावेतों केली. आराधना परिपूर्ण झाल्यावर त्याला नारा: यणभट्ट नांवाचा पुत्र झाला. या पुरुषाचे अंगीं अगदी बाळपणापासून शांति आदि- करून अनेक गुण दिसूं लागले व बाल्यत्वांतच त्यानें तपश्चर्या आरंभिली. त्या वेळी यवनराजांनीं श्रीविश्वेश्वराचे देवळाचा विध्वंस केला. त्यावर कांहीं काळाने सर्व भारत वर्षांत अनावृष्टि झाली. त्या वेळेस वृष्टि व्हावी ह्मणून मुसलमान बादशहानें ना- रायणभट्टाची प्रार्थना केली. तेव्हां नारायणभट्टानें प्रतिज्ञा केली कीं, साठ घटिकांचे आंत पाऊस पडेल. प्रतिज्ञेप्रमाणे अहोरात्राचे आंत सर्व पृथ्वीभर पाऊस पडला व तेणेकरून सर्वत्र आनंद होऊन गेला. असे झाल्यानंतर श्रीविश्वेश्वराचें देवालय पुनः बांधण्याची परवानगी यवन बादशहांजवळ मागितली ती त्यांनी दिली. तेव्हां नारायणभट्टानें श्रीविश्वेश्वराचें देवालय बांधून त्यांत विश्वेश्वराची स्थापना केली. अशी अलौकिक महत्कृत्ये करण्यापासून नारायणभट्टाचें लोकोत्तर ब्रह्मवर्चस ना- स्तिकांचे दृष्टीस आल्यावरून त्यांचें नास्तिक्य दूर झार्ले व त्यांचे अंतःकरणांत आस्तिक्य बुद्धि उद्भवून अत्यंत भक्तिमान् होत्साते ईश्वरभक्तिप्रेमभरानें सद्गदित हो- ऊन गेले. सर्वांनी नारायणभट्टास 'जगद्गुरु ' ही महापदवी देऊन त्याचे कुलांतील पुरुषांस अग्रपूजेचा मान दिला. ही कथा काशीक्षेत्रांत सर्वांस ठाऊकच आहे. 'त्रिस्थलीसेतु,' 'प्रयोगरत्न' आदिकरून अनेक ग्रंथ त्याने रचिल्यावरून नारा- यणभट्टाची सर्वशास्त्ररूप समुद्राचे पैलतीरास पोंचलेली अशी सर्व जगभर कीर्ति प सरलीच आहे. इतकेंच नव्हे परंतु त्यानें ग्रंथ निर्माण करून ठेवले होते ह्मणूनच वेद व स्मृत्यादिकांत सांगितलेले धर्माचें आजपावेतों रक्षण झालें, नाहीं तर धर्म बुडाले असते, ही गोष्ट सर्वमान्य आहे. नारायणभट्टाचा पुत्र रामकृष्णभट्ट यानें रचिलेले ज्योतिष्टोमपद्धति ग्रंथांत पुढे सांगितलेला वंशक्रम दिलेला आहे. त्या प्रकरणांतून खाली लिहिलेले दोन श्लोक उतरून घेतले आहेत. 6 ‘१ श्रीमदक्षिण देशांत अगस्त्य ऋषीचे योग्यतेचा भट्टगोविंद ह्मणून ब्राह्मण हो- ऊन गेला. सर्व पृथ्वीभर ज्याची कीर्ति असा श्री रामेश्वरभट्ट नांवाचा त्यास पुत्र होता. २ रामेश्वरभट्टाचा पुत्र नारायणभट्ट हा सर्व पृथ्वीभर सूर्याप्रमाणें तेजस्वी हो -