पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संस्कृत आवृत्तीचा उपोद्धात.. आजपावेतों राहिले नलते ). आपली प्रतारणा मूर्ख करील अशी वेदास भीति वाटते. इतिहासांनीं व पुराणांनी याला प्राचीन काळापासून निश्चल केला आहे. जें वेदांत दिसलें नाहीं तें स्मृतींनींच दाखविले आहे. जे दोहींतही दिसलें नाहीं तं पुराणांत दर्शविले जात आहे.." त्याचप्रमाणे सदाचारही प्रमाणभूत आहेत असे मनुवचनानें (अ० २०१२) सिद्ध आहे: “वेद, स्मृति, सदाचार, व आपल्या अंतःकरणास जें प्रिय वाटतें तें; हें चार प्रकारचें साक्षात् धर्माचें लक्षण होय असें (ज्ञात्यांनी ) सांगितलेले आहे. याज्ञवल्क्य ऋषीचेंही असेच वचन आहे (आ० १ श्लो० ७): “वेद, स्मृति, सदाचार, आपले अंतःकरणास जें प्रिय वाटतें तें व सत्कृत्य कर ण्यासाठीं संकल्प करण्यानें जी वासना उत्पन्न होते ती, हे धर्माचें मूळ होय असे सां- गितलेले आहे. " याप्रमाणे सर्व धर्मप्रकरणांत स्मृतिपुराणादि वचनांचे आधारानेच काय कर्तव्य व काय अकर्तव्य याचा निर्णय केला पाहिजे असें सिद्ध आहे खरें, तथापि कधीं कधीं स्मृतिवचनांचा परस्पराशीं विरोध येतो त्या ठिकाणी स्मृतिवचनांचा तर परस्पर विरो- ध वगैरे दोष न येऊं देतां त्या त्या विषयास अनुलक्षून यथायोग्य व्यवस्था साक्षात् स्मृतिवचनांवरून करणे ह्मटलें ह्मणजे बहुधा अशक्यच ह्मणून, त्या त्या विषयाचे तत्त्व जाणणाऱ्या पूर्वी होऊन गेलेल्या महान् विद्वान् ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथांत जो अर्थ स्थापित केला आहे त्यासच, गत्यंतर नाहीं ह्मणून, अनुसरणे अगदी अशक्य आहे. आतां असे धर्मशास्त्रावरील ग्रंथ अनेक आहेत. परंतु त्यांतही भट्ट नीलकंठ यानें रचि- लेल्या व्यवहारमयूख नांवाच्या ग्रंथांत विशेष विस्तार न करतां आधारभूत प्रमाणां- चा संग्रह मोठा आहे या कारणानें धर्मशास्त्राचे व्यवहारप्रकरण ह्मणून जी शाखा आहे त्या विषयाचे संबंधानें सर्व शास्त्रार्थाचा निर्णय करण्यांत याच ग्रंथाचा स्वीकार या देशांतील सर्व ज्ञाते पुरुष करीत आले आहेत ह्मणून या ग्रंथाचे भाषांतररूपानें म- हाराष्ट्र भाषेत स्पष्टीकरण करण्याचा आह्मीं हा यत्न केला आहे. याज्ञवल्क्य स्मृतीं- तही त्याचप्रमाणें धर्मसंबंधी बहुत विषयांचा संग्रह असलेला पाहून व ती विशेष वि- स्तृत नाहीं असे दिसल्यावरून त्या स्मृतीचें महाराष्ट्र भाषांतर आह्मीं या ग्रंथात जोडलें आहे. भट्ट नीलकंठ कोणत्या देशीं व कधीं उत्पन्न झाला व त्या पुरुषाची काय योग्य- ता हे समजण्यासाठी काशी क्षेत्री राहणारे व विद्वानांत अग्रगण्य वेदशास्त्रसंपन्न