पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संस्कृत आवृत्तीचा उपोद्धात.. “ वेदोऽखिलो धर्ममूलं ” ह्मणजे, संपूर्ण वेद हा धर्माचे मूळ होय, असें मनु (अ० २ श्लो० ६ ) आदिकरून इतर स्मृतिकारांचें वचन आहे ह्मणून या भरतखंडांत आचार, व्यवहार, प्रायश्चित्तरूप जे विविध धर्मवृक्षस्कंध त्यांस वेदच मूळ होय. या हेतू -- स्तव सर्व प्रकारचे धर्मप्रकरणांत व व्यवहारप्रकरणांत निर्णय करणें तें वेदासच अनु- सरून होणं अवश्य आहे, हे खरें; तथापि ज्या अर्थी मूळच्या वेदंशाखांतून पुष्कळ शाखा सांप्रत बुडालेल्या आहेत त्या अर्थी वेदापासून उत्पन्न झालेल्या स्मृतींवरून सर्व धर्मांचें ज्ञान आतां करून घेणें हैं योग्य होय. या हेतूनें विज्ञानेश्वरादि ग्रंथकारांनी ' मिताक्षरा' दिक ग्रंथ धर्मशास्त्रावर रचिलेले आहेत. स्मृतींस मूळ वेद ह्मणून स्मृ तिवचनास प्रामाण्य. याविषयीं मनु ( अ० २ श्लो० ७–८): अमुकाचा अमुक धर्म असें जें कार्य मनु स्मृतिकाराने सांगितलेले आहे तें सर्व वेदोक्तधर्मास अनुसरूनच आहे, कारण तो ऋषि सर्वज्ञानस्वरूप होता ह्मणून. वेदोक्तधर्म कोणता हें सर्व आपल्या ज्ञानचक्षूंनी पाहून वेदांत प्रमाणभूत जें होतें त्याचाच संग्रह त्या ज्ञानी पुरुषानें आपल्या स्मृतींत केलेला आहे." हेमाद्रिसंज्ञक अति विख्यात ग्रंथांत नारद पुराणांतील खाली लिहिलेले वचन दिलेले आहे: “ जे वेदांत दिसले नाहीं तें खरोखर स्मृतिग्रंथांनींच दाखविलें आहे." यासंबं- धानें हेमाद्रिग्रंथांत यमवचन आहे तें असें:--"प्राचीन काळी यांनी ( स्मृतिकारांनी ) जी. धर्मशास्त्रे रचिलीं तीं • सर्वथैव प्रमाणभूत समजली पाहिजेत. त्यांचा नाश कल्पना चालवून करूं नये.” अठरा स्मृति व तितक्याच उपस्मृति आहेत असें आचारमित्रोदय वगैरे ग्रंथांत. सांगितलेले आहे: “छत्तींस आणखी स्मृति आहेत असे दर्शविलेलें आहे, ," इत्यादिक भविष्यपुराणांतील वचनांचे आधारावरून हेमाद्रिग्रंथाचे दानखण्डप्रकरणांत लिहिलेलें आहे की, याहूनही आणखी दुसऱ्या स्मृति आहेत.. या कारणास्तव स्मृतिवचनात जसें प्रामाण्य त्याचप्रमाणे इतिहासग्रंथांतील व पुराणग्रंथांतील वचनेंही प्रमाणभूत होत असें सिद्ध होतें. हेमाद्रिग्रंथांत नारदपुराणां- तील याच संबंधाची आणखीही वचनें उल्लिखित आहेत ती अशी:-- " हे देवि, पुराण ग्रंथांनीच वेद कायम राखले आहेत यांत कांहीएक संशय नाहीं. (बेदोक्तधर्म पुराणांचे द्वारानेच सांप्रतपावेतों राहिलेले आहेत, पुराणांवांचून ते