पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्वितीयावृत्तीची प्रस्तावना. wwwwww या ग्रंथाची प्रथमावृत्ति ३० सं० १८६७ त छापली. तो संपण्यापूर्वी व्यवहारमयूख आणि याज्ञवल्क्यस्मृति हे दोन्ही मूळ ग्रंथ इंग्रजी भाषांतरासुद्धां छापवून त्यांबरोबर ‘आर्यधर्म'शास्त्राच्या मूलांविषयी. उपोद्घात व धर्मशास्त्राच्या व्यवहारखडांतर्गत कांहीं प्रकरणें ह्यांचें विवेचन, हा ग्रंथ इ० स० १८७९ साली छापून प्रसिद्ध केला. त्या दोन्ही संस्कृत ग्रंथांर्चे मराठी भाषांतर माझे विद्वान् मित्र बाळकृष्ण शास्त्री बापट ( डेपुटी एजुके- शनल इंस्पेक्टर, उमरावती, प्रांत वराड ) ह्यांणी करून दिलें. तें विद्वन्मुकुटमणी राजाराम शास्त्री बोडस यांच्या साहाय्यानें शोधून दुसऱ्या भागांत छापिलें आहे. भाग पहिला हा, जो पूर्वीचा ग्रंथ होता तोच वाढवून, त्यांत आजपर्यंतचे फैसले ठिकठिकाणी दाखल करून, टिपणीसुद्धां छापला आहे. तीन प्रकरणें नवीनच घातली आहेत; आणि परिशिष्टांत आ- णखीही संग्रह केला आहे. ह्या भागांत वे० " राजाराम शास्त्रीबुवा, व आमचे मित्र यशवंत वासुदेव आठल्ये, ह्यांणी पुष्कळ मदत केली आहे हणून मी त्यांचा आभारी आहें. मुक्काम मुंबई, माघ शुद्ध १५ शा० शके १८०४, ता. २१ फेब्रुअरि स० १८८३ इसवी. विश्वनाथ नारायण मंडलिक.