पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रथमावृत्तीची प्रस्तावना. wwwwwwww इसवी सन १८४४ साली मिताक्षरेचा व्यवहाराध्याय आणि व्यवहारमयूखाचा दा- यभाग यांची. भाषांतरे करून मुंबई. सरकारानें छापविली. त्यानंतर न्यायाच्या कामांत प्रमाण मानण्याजोगा सरकारांतून ग्रंथ छापविण्यांत आला नाहीं. त्या अळीकडे कांहीं निवाड्यांचीं पुस्तकें व कांहीं निवाड्यांच्या हांशिलांची पुस्तकें छापून प्रसिद्ध झाली आहेत. परंतु एक एक विषय घेऊन त्यावर आधारांसुद्धां : समग्र मराठी ग्रंथ कोठें आढळांत आला नाहीं. इंग्रजीमध्यें पुष्कळ ग्रंथ आहेत ते इंग्रजी वाचणारांस उपयोगी पडतच आहेत; प- रंतु केवळ मराठी समजणाऱ्या लोकांस चालू चालू ठरावांची माहिती होण्यास उपयोगी पडण्याकरितां या लहानशा पुस्तकाची योजना केली आहे. आतां जागजागी ज्या टिपा घातल्या आहेत त्यांत संस्कृत, मराठी व इंग्रजी ग्रंथांचे आधार सांगितले आहेत. त्यांचें वस्तुतः या ग्रंथांत कारण नाहीं; परंतु ते तसे न लिहावे तर सदरहू ग्रंथांचे तर्जुमे मराठीत झाले नसल्यामुळे, मुळींच आधार न लिहावे अथवा लिहून त्यांचा वाचणारांस होईल टि- तका उपयोग होऊं अशा बुद्धीनें रचना करावी, हे दोन मार्ग होते. त्यांतून मी दुसरा धरिला; कारण जरी केवळ मराठी जाणणारांस या आधारांचा उपयोग होणार नाहीं, तरी ज्यांसमोर या आधारांचा उपयोग करून दाखवावयाचा त्यांस दिक्प्रदर्शन करण्यास या टिपा उपयोगी पडतील; अथवा आपल्या इंग्रजी जाणणाऱ्या मित्रांकडूनही मूळ ग्रंथ पाहववितां येतील. साधारण इंग्रजी जाणणारांसही या पुस्तकाचा थोडाबहुत उपयोग हो- ईल अशी आशा आहे. हा ग्रंथ करण्यास वेदशास्त्रसम्पन्न पांडुरंगशास्त्री गुर्जर यांणी मला चांगली मदत केली आहे. तारीख ३० सप्टम्बर सन १८६७. विश्वनाथ नारायण मंडलिक.