पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. wwwwwwwwww ० ह्या ग्रंथाची ही तिसरी आवृत्ति. ही काढविण्याचे काम माझ्या दुर्दैवामुळे मजकडेस आलें. वडील, कै० रावसाहेब. विश्वनाथ नारायण मंडलिक, यांनी हा ग्रंथ रचिला, व त्याच्या दोन आवृत्ति काढविल्या. त्यांच्याच, किंवा निदान त्यांचे स्नेही व आमचे हितचिंतक कै रा० रा० यशवंत वासुदेव आठल्ये, एम् ~ ए०, एल् एल्० बी०, ज्यांनी दुसरी आवृत्ति काढ- ज्ञांना पुष्कळ मदत केली होती, त्यांचे तरी देखरेखीखालीं ही आवृत्ति निघाली असती . तर मला व इतर सर्वासही अत्यंत समाधान झालें असतें हें सांगावयास नकोच. परंतु ईश्वरेच्छेपुढें इलाज नाहीं. प्रस्तुतच्या आवृत्तीचें श्रेय आमचे स्नेही रा० रा० दाजी आबाजी खरे, बी. ए., एल् एल. बी., व बंधु ती० रा० रा० दामोदर • कृष्ण करंदीकर, बी. ए., यांच्याकडेस आहे. रा० करंदीकर यांनी बोग्य दिसले ते फेरफार करून, दुसऱ्या आवृत्तीनंतर हायकोर्टाचे आजतागाईत झालेले सर्व महत्वाचे ठराव उचित स्थली नमूद केले आहेत. सर्व ग्रं- थावर रा० खरे यांची देखरेख पूर्णपणे होती. या उभयतांचा मी अत्यंत आभादी आहे. नारायण विश्वनाथ मंडलिक. हर्मिटेज, खंबालाहिल, मुंबई: ता० २७ अक्टोबर १८९४.