पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दु धर्मशास्त्र. प्र० ११ शिवाय दुसरे अपील नं. ३६ स. १८८१ फडशा ता. ३ मे स० १८८२ यांत दौहित्र घेण्याची चाल सर्व कानडा जिल्ह्यांत आहे असें ५० वर्षांच्या आंतील उदाहरणांवरून शाबीत झाले असून तो आचार हायकोर्टानें कायम केला आहे. तोच शास्त्रार्थ कुलाचारासही अर्थात् लागू होईल. जोशी व उपाध्येपणाचे हक्क. २८८ जोशीपणाच्या हक्कांविषयीं फिर्याद. - एका जोशानें फिर्याद केली की, माझा अमुक गांवांत जोशीपणाचा हक्क असून त्या गांवांतील कांहीं घरीं प्रतिवादी हा हक्का- शिवाय धर्मकृत्यें चालवितो व दक्षिणा घेतो. कोर्टानें प्रतिवादीस वरील गांवांत जोशीप- णाचें काम न करण्याविषयी ताकीद द्यावी. हायकोटीनें ह्या कज्जांत असा ठराव केला की, ज्या लोकांच्या घरीं प्रतिवादी हा भिक्षुकी करतो त्या लोकांची प्रतिवादी ह्यासच धर्मकृत्ये चालविण्यास नेमण्याची खुषी असली तर कोर्ट ह्या बाबतींत प्रतिवादीस प्रतिबंध करूं शकत नाहीं.. परंतु अशा ठिकाणी वतनदार जोशास जो हक्क मिळावयाचा तो मात्र आह्मी यजमान व ज्याणें उ- पाध्याचें काम चालविलें त्याकडून ऐवज देवेंवूं. नव्या उपाध्यायाने चालविलेली लग्नें बेकायदा आहेत असा दावा गैरशिस्त आहे सबब आह्मी रद्द करितों. दुसऱ्या एका खटल्यांत हायकोर्टानें त्याची योग्य मिळकत देवविली." जोशीपणाची वृत्ति हुकुमनाम्या- च्या बजावणीत जप्त करतां व विकतां येत नाहीं.” त्याप्रमाणेच उपाध्येपणाच्या संबं- धानेंही आहे. ' 93 निबंध. (५२३.) कुळानें दर वर्षी देण्याच्या नियमित धान्याची किंमत घेण्याचा हक्क हा निबंध होतो." १४ नायकिणी. (५२४.) नायकिणींनीं गाणें शिकण्यासाठी कर्ज काढून रोखे लिहून दिले तर ते गैरकायदा नाहींत, कारण गायन हा स्वतंत्र उपजीविकेचा धंदा आहे व त्याचा दुर्नीतीशीं संबंध आहेच असें नाहीं.' १५ १०. राजशिवाप्पा वि. कृष्णंभट्ट इं. ला. रि. ३ मुं. २३२. ११. वामन वि. बाळाजी इं. ला. रि. १४ मुं. १६७. १२. गोविंद वि. रामकृष्ण इं. ला. रि. १२ मुं ३६६. १३. गणेश वि. शंकर इं. ला. रि. १० मुं. ३९५. १४. मोरभट वि. गंगाधर इं. ला. रि. ८ मुं. २३४. १५. खूबचंद वि. बेराम इं. ला. रि, १३ मुं, १५०.