पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण अकरावें. किरकोळ. निरनिराळे प्रांत. (११९) एक बंगाली शुद्राचें कुटुंब बंगाल प्रांताच्या नैर्ऋत्य दिशेकडील प्रदेशांतून पूर्णया प्रांतांत निघून आलें होतें, आणि पूर्वीच्या प्रांतांतील धर्माच्या रोती व कुटुं- बाच्या चाली सोडून पूर्णिया प्रांतांत में मैथिलशास्त्र चालत होतें त्या मैथिलशास्त्राप्र माणें त्याणें आपला आचार चालविला होता. तेव्हां अशा कुटुंबाच्या दायविभागा- ची व्यवस्था होणें तो मैथिलशास्त्राप्रमाणें झाली पाहिजे असा प्रिव्ही कौन्सिलाने ठ- राव केली. दुसरें एक कुटुंब बंगाल्यांतून मिदनापूर प्रांतांत येऊन राहिलें होतें; परंतु त्यांतील लोकांनीं आपले धर्मसंबंधी आचार मूळच्या प्रांतांतील ह्मणजे बंगा- ल्यांतील धर्मशास्त्राप्रमाणें ( ह्मणजे जीमूतवाहनकृत दायविभागाप्रमाणें ) चालविले होतं. मिदनापूर प्रांतांत मिताक्षरा चालते त्याप्रमाणे ते करीत नसत; यास्तव त्या कुटुंबां- तील दायाचा ठराव दायभागावरून व्हावा, मिताक्षरेवरून होऊं नये, असा ठराव झाला. विरुद्ध पुरावा नसेल तर ज्या भागांत हिंदुधर्म स्वीकारणारें कुटुंब रहात असेल त्या भागांतले धर्मशास्त्राचे ग्रंथ त्यास लागावयाचे. 3 जैन लोक. २ (५२०.) जैन लोक ज्या देशांत राहात असतील, तेथें जें हिंदुधर्मशास्त्र चालू असेल त्याप्रमाणें त्या जैनांच्या दायाची व्यवस्था होईल. त्याहून निराळें शास्त्र अथ- वा रीति आपणास लागू आहे असें ज्याचें ह्मणणें असेल, त्या त्या • रीतीची शाब्दि केली पाहिजे. देशरिवाज आणि वचनांचे वजन. (५२१.) लोकांनी मान्य केली नाहींत अशा वचनांनी वारशाच्या व अन्य कामी देशरिवाज रद्द करणें गैरशिस्त आहे. " १. मूर्स ई. अ. वा. ४ पृ. २६९: राणी पद्मावती वि. बाबू दुलारसिंग. २. राणी श्रीमतीदेवी वि. राणी कुंदलताः ४ मू. इं. अ. २९२. ३. रामदास वि. चंद्रादासी इं. ला. रि. २० क. ४०९. ४. ८ स. वी. रि. ११६, रे. अ. ३०९, स. १८६५; ९ मू. इं. अ. ६०८. ५. मू. इं. अ. व्हा. १४ पा १७६.