पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १० सार्वजनिक धर्मकृत्यें. २८५ कजांवर साधारण दृष्टि मात्र ठेवावी. त्या इस्टेटीच्या व्यवस्थेच्या आंतल्या भानगडींत पडूं नये. अवोकेट् जनरल वि० विश्वनाथ आत्माराम मुं० हा० रि० वा० १ परिशिष्ट पृष्ट ९ इं० ला० रि० ५ मुं० १७०. जातीस जेवणें घालण्यासाठीं व उत्सवादिकांकरितां द्रव्याचा उत्सर्ग केला असल्यास तेंही सार्वजनिक धर्मकृत्य मोजलें जाईल ( पाहा वरील रपोटीचें पुस्तक, परिशिष्ट पृ० १७ ). इसवी सन १८६३ चा आक्ट २० हा सार्वजनिक देणग्यांनाच लागतो. खाजगी वडिलार्जित देवतेच्यासाठी लागत नाहीं: ( प्रतापचंद्र वि० व्रजनाथ- मिश्र इं० ला० रि० १९क० २७५ ). मठ — गोसाव्यांचा. - गोसाव्यांच्या मठास उद्देशून जी जमीन दिलेली आहे, ती आपल्या हयातीच्या पलीकडे उपभोग करणाऱ्या गोसाव्यास गुंतवून टाकितां येत नाहीं ह्मणून ती देणगी मठाची आहे असें कोर्टानें ठरविलें. खुशालचंद वि० महादेवगिरी, मुं० हा ० रि० वा० १२ पृ० २१४. ई० ला० रि० ५ मुं० ३९६; ६ मुं० ५०; ९ मुं० २२१ पहा. सीक लोकांचा ग्रंथ. हा देवालयांतून काढूं नये, त्या पंथाच्या लोकांच्या पूजेकरितां वगैरे देवालयांतच ठेवावा असा दावा चालेल, असा ठराव पाटणा शहरांतील गुरु गोविंद सिंधच्या मंदि- रासंबंधी झाला; त्या मंदिरास हरमंदिर ह्मणतात. धरमसिंघमहंत वि० किसनसिंघ, इं० ला० रि० क० वा० ७ पृ० ७६७. इं० ला० रि० १२ मुं० २६१ पहा. टीप:--स० १८६३ चा आक्ट २० ह्यांत अशा बाबतींत उपयुक्त माहिती आहे. देवाला दिलेली इस्टेट. देवासाठी इस्टेट दिली तर तिचा इंग्रजी कायद्यांतल्यासारखा ट्रस्ट करण्याची जरूर नाहीं; वहिवाट करील तो व्यवस्थेसाठी जबाबदार होईल: मनोहर गणेश वि० लक्ष्मीराम इं. ला. रि. १२ मुं. २४७.