पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८४ हिंदुधर्मशास्त्र. प्र० १०. भट वि० सीताराम गणेश, मुं० हा० रि० वा० ६ (दिवाणी अपील शाखा ) पृ० २५०. इं० ला० रि० २ मुं० ४७१; ६ मुं० ३००. ( ४ . ) भोगवटा. तीस वर्षांहून जास्त भोगवट्याच्या सबबीनें पुजाण्याची नेमणूक वंशपरंपरेची आहे असें ठरविलें (खेडा जिल्ह्याचा कलेकटर वि० हरिशंकर ती- कम, मुं० हा० रि० ( दि० अ० शा० ) वा० ५ पृ० २३. ( ५. ) जेथें अशी नेमणूक वंशपरंपरेच्या हुद्याशी संलग्न नसेल, अथवा ती स्थावरा- च्या उत्पन्नांतून देवविलेली नसेल तेथें ती ३० वर्षे उपभोगिल्यानें निरंतर उपभोगाची मालकी उत्पन्न होत नाहीं. मुंबई सरकार वि० गोस्वामी श्रीगिरिधारी लालजी, मुं० हा० रि० वा० ९ पृ० २२२. इं० ला० रि० ५ मुं० ३३० पहा. टीपः – स० १८७१ चा आक्ट २३ पास झाल्यापासून पुढें अशा नेमणुका जेथें सरकार तिजोरींतून आदा होत असतील, तेथें सरकारावर दावे चालावयाचे नाहींत. (६.) देवाची पूजा करण्याचा हक्क ह्यांत स्थावर मिळकतींचा संबंध येत नाहीं असें बंगाल हायकोर्टानें ठरविलें आहे. ईशन चंदर राय व दुसरे वि० मनमोहिनी दासी, इं० ला० रि० क० वा० ४ पृ० ६८३. देवस्थान. ( १.) देवाचे पैसे, अथवा देवालयासंबंधी द्रव्याची अव्यवस्था झाली असतां त्या देवाच्या सर्व पूजकांस त्याबद्दल फिर्याद करण्याचा हक्क आहे. राधाबाई व दुसरा वि० चिमणाजी रामजी साळी व दुसरे इं० ला० रि० मुं० वा० ३ पृ० २७, इं० ला० रि० ३ अ० ६४०; ८ मुं ४५०; १५ मुं० ६२३; २० क० ४०८; १म० ३८५ पहा. (२.) देवावर अमुक दागिने वतनदार पुजाऱ्यानें अमुक दिवशीं कमिटीपासून घेऊन घालावे, व त्यांबद्दल तो जबाबदार आहे असा ठराव व्हावा असा मुंबई इलाख्यांत मौजे परशराम एथील भार्गवराम संस्थानच्या कमिटीनें दावां आणिला; तसा दावा दिवाणींत चालत नाहीं असा ठराव झाला. वासुदेव व दुसरा वि० वामनाजी व दुसरे, इं० ला० रि० मुं० वा० ५ पृ० ८०. स्थावराची विकरीः— योग्य प्रसंगी सार्वजनिक इमारतीची विकरी करितां येईल असें ठरविण्यांत आलें. माणिकलाल आत्माराम वि० मंचरशाहा, इं० ला० रि० मुं० वा० १पृ० २६९. इं० ला० रि० ८ मुं० २११ व १३ म० २७९; २५ मुं० ६३५ पहा. टीप:— विकरीपासून जें उत्पन्न होईल त्याचा विनियोग मूळच्या उत्सर्गाच्या उद्देशास अनुसरून झाला पाहिजे. सार्वजनिक हिंदुधर्मसंबंधी देणग्यांचा उपयोग बरोबर करविण्याकरितां दावे आणणें ते आड्वोकेट् जनरल यांचे नांवें आणावे; आणि त्या अधिकान्यानें त्या